सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या दिपावली कालावधीतील उर्वरीत सुट्ट्या जाहीर! शिक्षणाधिकारी कार्यालयतून परिपत्रक जाहीर!

शैक्षणिक अपडेट :  दिपावली कालावधीतील रद्द केलेल्या सुट्ट्या  सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा कडून जाहीर करण्यात आल्या आहेत. या संदर्भात शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद यांनी एक पत्र काढत सुट्ट्या कालावधी जाहीर केला आहे. यानुसार दिपावली कालावधीतील उर्वरीत सुट्टी हि दि .१३.०१.२०२२ ते १५.०१.२०२२ लावधीतील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहेत .

विविध शिक्षक संघटनेचे समक्ष व दुरध्वनीद्वारे केलेली मागणी , उपरोक्त विषयान्वये शिक्षक संघटनेच्या मागणीनुसार दिपावली कालावधीतील उर्वरीत सुट्टी हि दि .१३.०१.२०२२ ते १५.०१.२०२२ लावधीतील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे . याबाबत सर्व मुख्याध्यापकांना आपले स्तरावरून अवगत करावे, असे सांगण्यात आले आहे.

परिपत्रक

सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या दिपावली कालावधीतील उर्वरीत सुट्ट्या जाहीर! शिक्षणाधिकारी कार्यालयतून परिपत्रक जाहीर!


TET Update 2022 : शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) प्रमाणपत्र चौकशीचे आदेश!

TET Update 2022


शैक्षणिक अपडेट
: राज्यात TET पेपर फुटीच्या प्रकारा नंतर शासनाकडून मोठया प्रमाणात कार्यवाही होताना दिसत आहे. शिक्षण विभागा कडून शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) प्रमाणपत्र चौकशीचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यातील जबाबदार अधिकारी वर्गाला प्रत्येक तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळामधील शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) उत्तीर्ण शिक्षकांची मूळ प्रमाणपत्रे पडताळणी साठी जमा करण्यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत.

सदर आदेश परिपत्रका नुसार  मा . संचालक यांची व्हीसी मधील सूचना दिनांक 04.01.2022 . उपरोक्त संदर्भिय विषयान्वये मा . संचालक महोदय यांनी दिनांक 04.01.2022 च्या व्हीसी मध्ये सांगितल्यानुसार दिनांक 13.02.2013 नंतर सेवेत TET पात्रता प्रमाणपत्र आधारे रुजू झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी तातडीने करावयाची आहे . तेव्हा आपल्या तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळामधील शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) उत्तीर्ण शिक्षकांची मूळ प्रमाणपत्रे पडताळणी साठी दिनांक 05.01.2022 रोजी सायंकाळी 5.00 वा . पर्यंत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी येथे प्राप्त होणे गरजेचे आहे .

तेंव्हा आपण आपल्या तालुक्यातील अपेक्षीत सर्व मुळ प्रमाणपत्रे हस्तगत करून वेळेत आपण स्वतः दाखल करावीत . सर्व मुख्याध्यापकांनी या कामी विनाविलंब सदर प्रमाणपत्रे संबंधित तालूक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांचेकडे पोहच करावीत . गटशिक्षणाधिकारी यांनी या कामी एका खास व्यक्तीची नेमणूक करुन कामाचा पाठपुरावा करावा व प्रमाणपत्र दाखल करावीत असे स्पष्ट केले आहे. सदर प्राप्त प्रमाणपत्रे सोबतच्या नमुण्यात यादीसह सादर करावयाची आहेत. 

TET Update 2022 : शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) प्रमाणपत्र चौकशीचे आदेश!

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2021-22: शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणीस मुदत वाढ!

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2021-22


वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2021-22
: वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी SCRT , Maharashtra , Pune ( राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ) यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे . सदर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे . या पोर्टल मार्फत शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे . वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाकरिता शिक्षक Online नोंदणी करावी लागणार आहे . नोंदणी कशी करावी व त्याविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे . वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण याविषयीची माहिती देणारे पत्रक SCRT , Maharashtra , Pune ( राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ) यांचेकडून नुकतेच निर्गमित करण्यात आलेली आहे . दरम्यान वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2021-22 च्या नोंदणीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेले pdf परिपत्रक पहा.

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2021-22: शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणीस मुदत वाढ!

डाउनलोड परिपत्रक : येथे क्लिक करा.

दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! यंदा बोर्डाच्या परीक्षेच्या पेपरला अर्धा तास वेळ जास्त मिळणार!

Ssc / hsc बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022


शैक्षणिक अपडेट
: माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य बोर्डाने  परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे आणि अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे . त्यामुळे सर्व विषयांचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होती . कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांचे पेपर लेखन राहू नये , म्हणून सदरची वेळ वाढवून दिल्याची माहिती अध्यक्ष मंडळाचे शरद गोसावी यांनी दिली .

दहावी बारावीच्या ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी प्रत्येकी १५ मिनिटे तर ८० ते १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास , असा वाढीव वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

दरम्यान नुकतेच मंडळाकडून दहावी , बारावीच्या  लेखी परीक्षेचे   सविस्तर वेळापत्रक  लेखी  मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील मिळणार आहे . वेळापत्रक अंतिम असणार आहे . वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट अन्य व्हावे , संकेतस्थळावरील सात अन्य यंत्रणेने छपाई केलेले किंवा वेळापत्रक ग्राह्य धरू नये , असे विभागामार्फत शिक्षण स्पष्ट करण्यात आले आहे . दरम्यान , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ . वसंत काळपांडे म्हणाले की , मागील वर्षीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात आला होता . विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव तुटला आहे , त्यामुळे राज्य मंडळाने घेतलेला निर्णय योग्य व विद्यार्थीहिताचा आहे असे मत सर्व स्तरातुनव्यक्त होताना दिसते आहे.

वेळापत्रक :

दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! यंदा बोर्डाच्या परीक्षेच्या पेपरला अर्धा तास वेळ जास्त मिळणार!

महा ‘ टीईटी ‘ परीक्षा पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती!! राज्य परीक्षा विभाग अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पोलीसांनी चौकशीला बोलावले !

महा ' टीईटी ' परीक्षा पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती!! राज्य परीक्षा विभाग अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पोलीसांनी चौकशीला बोलावले !


शैक्षणिक अपडेट : 
राज्यात शिक्षक पात्रता चाचणी ( महा टीईटी ) परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यावर सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. राज्य सायबर सेलने तत्पर चौकशी करत, एक संशित व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यावर राज्य परीक्षा विभाग अध्यक्ष तुकाराम सुपे यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी आज तुकाराम सुपे यांची दिवसभर चौकशी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्षच संशयाच्या भवऱ्यात अडकला आहे.

दरम्यान शिक्षक पात्रता चाचणी ( महा टीईटी ) परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सायबर सेलने प्रतिश देशमुख नामक व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्या कडे तीस ते चाळीस टीईटी अपात्र उमेदवारांची प्रवेशपत्र आढळून आली होती. त्यामुळे पेपर फुटीच्या या प्रकरणात अनेक शिक्षक, परीक्षार्थी, अधिकारी यांचा सहभाग असण्याचा संशय आहे. टीईटी पेपर चा दर हा दीड लाख ठरल्याचा प्राथमिक माहिती समोर आली असून शिक्षक असेल तर तीन लाख रुपये यासाठी मोजल्याचे काही विद्यार्थ्यांकडून बोले जात आहे. यामध्ये दहा ते पंधरा शिक्षक यामध्ये एजेंटगिरी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. हे शिक्षक अनेक परीक्षार्थीना भेटल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी सुरु! डाउनलोड जीआर.

शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी 2021-22

शैक्षणिक अपडेट :  वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांसाठी @scertmaha तर्फे नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. पात्र शिक्षकांनी https://t.coIeJ02QOzur संकेतस्थळावर आवश्यक शुल्क भरून नावनोंदणी करावी,सदर नोंदणी दि.२३.१२.२०२१ पर्यंत सुरू राहील. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर जीआर ट्वीट करीत दिली आहे.अधिक माहितीसाठी दिलेला जीआर डाउनलोड करा.

( Senior scertmaha has started enrollment for eligible teachers for senior pay grade and selection grade training.  Eligible teachers should register on https: //t.coIeJ02QOzur website by paying the required fee, this registration will continue till 23.12.2021.)

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे .. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे . सदरील पोर्टलवर प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक / मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे .

यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे

१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेत स्थळास भेट द्यावी .

२. दि . ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील .

३. दि . ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील .

४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २३ नोव्हेंबर , २०२१ ते २३ डिसेंबर , २०२१ पर्यंत सुरु राहील .

५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे . याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई – मेलद्वारे देण्यात येतील .

६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत- गट क्र . १ प्राथमिक गट , गट क्र . २ माध्यमिक गट , गट क्र . ३ उच्च माध्यमिक गट , गट क्र . ४ अध्यापक विद्यालय गट . ७. प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID , शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी .

८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा .

९ . प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई – मेल आय . डी . असणे आवश्यक आहे . सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई – मेल आय . डी . वर पाठविण्यात येतील .

१०. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी . आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास “ माहितीत बदल करा ” या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल . ११. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत . तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील .

१२. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक , प्रादेशिक विद्या प्राधिकरण , मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील . )

१३. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बैंकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा . उदा . युझर आयडी , पासवर्ड इ .

१४. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु .२,००० / – ( अक्षरी रुपये दोन हजार मात्र ) शुल्क ऑनलाईन पद्धतीने ( Credit & Debit Card , Internet Banking , UPI Payment ) अदा करणे आवश्यक आहे . प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे , एकदा जमा केलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी , यासंदर्भात परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये .

१५. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई – मेल आयडीवर संपर्क करावा .

१६. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे . केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत . त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे .

१७. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल . शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल .

१८ . १ ९ . सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे . उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील पात्र शिक्षकांना आपल्या स्तरावरून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे .

डाउनलोड जीआर : येथे क्लिक करा