शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! जुनी पेन्शन योजना संदर्भात शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! जुनी पेन्शन योजना संदर्भात शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.

शैक्षणिक अपडेट : राज्यातील सुमारे ३५ हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासाठी आनंदाची बातमी आहे.जुनी पेन्शन योजना लागू कारण्या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना नुकतेच दिले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध शैक्षणिक संस्थेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त केलेल्या सुमारे ३५ हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाची जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली शासन स्तवरून सुरु झाल्याने शिक्षक वर्गात दिलासदायक वातावरण आहे.

दरम्यान  हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे सादर होणार असून, त्यास मंजुरी मिळाल्यास नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित,वाढीव तुकड्यावर कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ होणार आहे.

राज्याच्या विविध विभागांतील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार व विविध शिक्षक संघटनांनी वर्षानुवर्षे पाठपुरावा व आंदोलने केली आहेत.परंतु आता आगामी निवडणुका आणि हजारो शिक्षकांची मागणी आणि मानसिकतेचा सकारात्मक विचार करून शालेय शिक्षण मंत्री आणि राज्य सरकारने हा प्रश्न निकाली काढण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर सध्या तरी शिक्षकव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

कौतुकास्पद ! रणजित डिसले गुरुजी बनले डॉक्टर, मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित!!

ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठ कडून रणजितसिंह डिसले (गुरुजी) यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.


शैक्षणिक अपडेट
: युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार पटकवणारे रणजीतसिंह डिसले गुरुजींना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. शिक्षण क्षेत्रातील कौतुकास्पद कार्यबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठ कडून रणजितसिंह डिसले (गुरुजी) यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक असणारे आपल्या नवनवी शैक्षणिक प्रोयोगाने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या डिसले गुरुजी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली.असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. आता मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याने आणखीन एक सन्मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात खावला गेला आहे.

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ‘ग्लोबल टीचर प्राइझ’ ओळखले जाते. दहा लाख अमेरिकन डॉलर असे त्याचे स्वरूप आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) शाळेत मागील अकरा वर्षांपासून रणजितसिंह डिसले गुरुजी हे शैक्षणिक तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगामुळे जगभर ओळखले जातात. त्यांनी तयार केलेली ‘क्यूआर कोड’ शैक्षणिक पाठय़पुस्तके सध्या अकरा देशांतील दहा कोटींपेक्षा जास्त मुले वापरत आहेत. ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून डिसले गुरुजी दीडशेपेक्षा जास्त देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.

SSC HSC Exam 2021 : इ . १० वी व इ . १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार! शासन परिपत्रक जारी.

SSC HSC Exam 2021 अपडेट


SSC HSC Exam 2021
: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे मार्फत सन २०२१ मधील इ . १० वी व इ . १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार ( कोविड –१ ९ च्या प्रादुर्भावामूळे ) रद्द करण्यात आली . तसेच मा . उच्च न्यायालय , मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( इ . १० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( इ .१२ वी ) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशतः करण्यात येत आहे .

हेही वाचा : HSC Exam 2021 : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा बोर्डाकडून जाहीर !

यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक १२/११/२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून मंडळाचे १ ) इ . १० वी व १२ वी साठी mahahsscboard.in २ ) इ . १० वी साठी https://feerefund.mh-ssc.ac.in व ३ ) इ . १२ वी साठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून / लिंकव्दारे नोंदविणे आवश्यक असणार आहे . अशी सूचना सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी याबाबत देण्यात आली आहे.

परिपत्रक पहा : डाउनलोड 

HSC Exam 2021 : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा बोर्डाकडून जाहीर!

HSC Exam 2021: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education today announced the schedule for filling up applications for the Higher Secondary Certificate Examination to be held in 2022, i.e. Class XII (XII).  Applications for the exam will be accepted from November 12 and schools are urged to fill up online applications on the website www.mahahsscboard.in for 12th standard students, said Varsha Gaikwad, Minister of State for Education.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून 2022 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी म्हणजेच इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. सदर परीक्षेचे अर्ज 12 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार असून शाळांना  बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तपशील पुढीलप्रमाणे –

सदर परीक्षा अर्ज http://mahahsscboard.in येथे घेतले जातील. नियमित विद्यार्थ्यांना 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आले असून, परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायचे आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज वेळापत्रक 

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.

SSC HSC Exam Update : यंदा दहावी-बारावीची लेखी परीक्षा होणार ! वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

SSC HSC Exam 2022 Update


SSC HSC Exam 2022
: राज्यात माघील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा रद्द झाल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देऊन बोर्डा कडून निकाल जाहीर करण्यात आला. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे व लसीकरणही मोठया प्रमाणात झाल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शालेय शिक्षण विभागाने दहावी-बारावीची लेखी परीक्षा घेण्या संदर्भात चाचपणी केली असता दहावी बारावीची ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांसह तज्ज्ञ सकारात्मकता दाखवली आहे. याशिवाय विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटना, पालक संघटना, राज्य शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. त्यात पालक-विद्यार्थ्यांसह विविध तज्ज्ञांनी ऑफलाइन परीक्षा घेण्यास संमती दर्शवली आहे.

दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर होणार. 

राज्य शिक्षण मंडळाने आपल्या 9 विभागीय मंडळांमधून परीक्षेच्या तयारीबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार असल्याने , लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

शैक्षणिक अपडेट : राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी आता महास्टुडन्ट अॅपद्वारे लागणार!

विद्यार्थ्यांची हजेरी आता महास्टुडन्ट अॅपद्वारे


शैक्षणिक अपडेट
: राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन लावण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मान्य केला आहे. यापुढे राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी आता महास्टुडन्ट अॅपद्वारे नोंदविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी शालेय शिक्षण विभागाला सदर प्रस्ताव दिला होता.

राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी आता महास्टुडन्ट अॅपद्वारे नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे . त्यामुळे राज्यातील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती आता एका क्लिकवर समजायला मदत होणार आहे .

महास्टुडन्ट अॅपची कार्यपाद्धती –

  • तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा , शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे .
  • भारत सरकारने प्रोग्राम्स गार्डिंग इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला आहे . यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थिती यासाठी स्टोअरवर महास्टुडन्ट नावाने उपलब्ध आहे .
  • या ॲपमध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .
  • शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती सहजपणे नोंदविता येणार आहे .
  • याच सोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदणीची . सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे .

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळां या संदर्भात मोठया प्रमाणावर कामकाज होत आहे. यामध्ये राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा , शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरणे याच बरोबर भारत सरकारने प्रोग्राम्स गार्डिंग इंडेक्स हा निर्देशांक विकसित केला आहे . यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थिती यासाठीराज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.