२७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचे शाळांना आदेश! परिपत्रक जारी.

शैक्षणिक अपडेट्स : २७ सप्टेंबर , २०२१ हा जगभरात जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो . युनायटेड नेशन वर्ल्ड टूरीझम ऑर्गनायझेशन ( UNWTO ) यांच्याव्दारे या वर्षी जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ” Tourism for Inclusive Growth ” ( सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ) हे घोषित करण्यात आले आहे . 

या निमित्ताने शालेय स्तरावर पर्यटन वाढ व जाणीव जागृती साठी स्पर्धा आयोजन ( उदा- शालेय मुलांच्या चित्रकला स्पर्धा व सर्वांसाठी फोटोग्राफी स्पर्धा ) करणे , पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था , व्यक्ती यांचेसोबत परिसंवाद चर्चासत्रे इ . कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहेत. तसेच सदर कार्यक्रमांची छायाचित्रे , बातमी पर्यटन संचालनालयाच्या विभागीय कार्यालयास पाठवावयांची आहेत.

27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन 2021

सरकारी शाळा होणार आदर्श शाळा , सरकारचा मोठा निर्णय! ‘ या ’ भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार, वाचा. !

सरकारी शाळा आदर्श होणार


शैक्षणिक अपडेट्स :
राज्यातील सरकारी शाळांचा कायापालट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून सरकारी शाळामधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी , राज्य सरकारने तब्बल 488 सरकारी शाळांचे रुपांतर आदर्श शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेतलाय . त्यासाठी राज्य सरकार पहिल्या टप्प्यात 494 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली . 

राज्यात विकसित केल्या जाणाऱ्या या आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास करण्यावर लक्ष दिले जाणार आहे . त्यात नवनिर्मितीला चालना , समीक्षात्मक विचार , वैज्ञानिक प्रवृत्ती संविधानिक मुल्ये अंगी बाणविणे , संभाषण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .

वर्षा गायकवाड – शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य 

‘ या ’ भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार !

सरकारी शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत . त्यात स्वतंत्र शौचालये , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , सुस्थितीतील वर्ग , आकर्षक इमारत , क्रीडांगण , क्रीडा साहित्य , ICT लॅब , सायन्स लॅब , ग्रंथालय यांसारख्या सुविधांचा समावेश असणार आहे . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे . ग्रंथालयांत पूरक वाचनाची पुस्तके , संदर्भग्रंथ , इनसायक्लोपिडिया उपलब्ध असतील . स्वअध्ययनासह गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही राबविले जाणार आहेत .

समग्र शिक्षा अभियानामार्फत आदर्श शाळांचे बांधकाम करण्यात येईल . त्यासाठी 100 कोटींचा निधी ई – गव्हर्नंसच्या निधीमधून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले .

शाळ निवडीचे निकष कोणते ? 

आदर्श शाळांची निवड काही निकषांवर केली जाणार आहे . त्यात आकर्षक शाळा इमारत , विद्यार्थीसंख्येनुसार वर्गखोल्या , मुलां – मुलींकरीता स्वतंत्र स्वच्छतागृहे , पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन , मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष , शैक्षणिक – खेळाचे साहित्य असावे .

ग्रंथालय / वाचनालय , संगणक कक्ष , व्हर्चुअल क्लास रूमची सुविधा , विद्युतीकरण सुविधा , शाळेला संरक्षक भिंत , आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील उपलब्धता , विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्धता या निकषांवर शाळांची निवड होणार आहे .

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .१० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ .१२ वी ) सप्टेंबर -ऑक्टोबर २०२१ पुरवणी परीक्षा वेळापत्रकाबाबत जाहीर !

SSC & HSC BORD EXAM 2021


शैक्षणिक अपडेट्स
:  सन २०२१ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .१० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ .१२ वी ) मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच ए.टी.के.टी.साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर -ऑक्टोबर २०२१ मध्ये होणार असून, बोर्डाकडून त्या संदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येत आहे . त्यानुसार लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येत आहे .

इ .१० वी प्रात्यक्षिक , श्रेणी , तोंडी परीक्षा मंगळवार दिनांक २१ / ० ९ / २०२१ ते सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ व इ .१२ वी प्रात्यक्षिक , श्रेणी , तोंडी परीक्षा बुधवार दिनांक १५ / ० ९ / २०२१ ते सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत . उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेल्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक २७/०८/२०२१ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे . 

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे . परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल . त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे . अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खाजगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरु नये , याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे सूचित केले आहे.

ssc & hsc पुरवणी परीक्षा वेळापत्रक

राज्यात शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक ! शिफ्टनुसार मुलांना शाळेत बोलावले जाणार.

चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य समीर दलवाई यांची महत्वपूर्ण माहिती

शाळा सुरु होणार


शैक्षणिक अपडेट्स
: राज्यात आता कोविड 19 पेशंट आढळण्याचा दर कमी झाला आहे. कोरोनाची लाट बऱ्यापैकी ओसरली आहे . तसेच ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु केले जाणार  असून त्याच वेळी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आल्याने लवकरच शाळांची घंटा वाजण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे .

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत पालकही सकारात्मक आहेत . या पार्श्वभूमीवर ‘ चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य समीर दलवाई यांनी शाळा सुरु करण्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली . ते म्हणाले की , ‘ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळांनी पूर्ण तयारी केली असल्यास शाळा उघडण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे . 

ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु होणार असले , तरी लसीकरणाचा नि शाळा सुरु करण्याचा मात्र कोणताही संबंध नाही . मुलांना कोरोना संसर्ग झाला , तरी तो सौम्य स्वरुपात असतो . मात्र , प्रौढांना होणारा संसर्ग गंभीर आहे . त्यामुळे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हायला हवे . 

       –  समीर दलवाई  ( चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य 

मुलांच्या लसीकरणाचा नि शाळा सुरु करण्याचा संबंध नाही . मात्र , मुलांचे लसीकरण करणेही गरजेचे आहे . तसेच कोविड प्रतिबंध नियमाचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे टास्क फोर्स कडून सांगितले जात आहे. मास्क वापरणे , सोशल डिस्टन्सिंग , सॅनिटायझेशन हेच नियम पाळावे लागणार आहेत.

दरम्यान मुलांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागेल ते म्हणाले , की ‘ कोविडमुळे ही मुले दीड वर्षांपासून घरात आहेत . शाळा सुरु करताना , या मुलांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागणार आहे . सुरुवातीच्या काळात अभ्यास एके अभ्यास न करता , मुलाचे ‘ सोशल रिहॅबिलिटेशन ‘ कराले लागेल . शिफ्टनुसार मुलांना शाळेत बोलावण्या बाबत नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यातील सर्व माध्यमाच्या १ ली ते १० वीच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे! शासन परिपत्रक जारी.

मराठी विषय सक्ती

शैक्षणिक अपडेट्स : शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी अधिनियम पारित करण्यात आला असून त्याद्वारे राज्यात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सर्व माध्यमाच्या , व्यवस्थापनाच्या व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे . सदर सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन यांचे कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सदर माहिती ही महाराष्ट्र राज्यातील CBSE , ICSE , IB , CAMBRIDGE या बोर्ड अंतर्गत शाळांना मराठी भाषा सक्तीची अधिनियम -२०२० यास अनुसरून प्राप्त करण्याकरिता सूचित करण्यात आलेले आहे.या अंतर्गत लिंक तयार करण्यात आली आहे.त्यानुसार आपल्या अधिनस्त असलेल्या CBSE , ICSE , IB , CAMBRIDGE या बोर्ड अंतर्गत शाळांना पुढील लिंकवर 

https://www.research.net/r/MARATHIBHASHA

क्लिक करून लिंक मधील सर्व प्रश्नांची माहिती भरणे बाबत सूचना देण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी . उपरोक्त माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे.या कार्यालयास दि .३१ / ८ / २०२१ पर्यंत प्राप्त होणे आवश्यक आहे . या कारणास्तव उपरोक्त विषयाबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी .

MET 2021: Manipal Academy extends registration deadline for MET 2021, starts slot booking for online test.

Manipal Academy of Higher Education (MAHE) has extended the deadline for online registration for Manipal Entrance Test (MET) 2021.  Students will now be able to apply for MET 2021 till June 5 at manipal.edu.  Let us inform that amid the Kovid epidemic, MET 2021 will be conducted in online proctored mode from June 11 to June 14.

The students who qualify the Manipal entrance test will be eligible for admission to the undergraduate courses offered by the university.

Slot booking started for Remote Proctored Test

 The academy has also started slot booking for online remote proctored test.  Already registered candidates can now book their MET slots on the official website manipal.edu.  Applicants will need their application number and password for MET slot booking 2021.  Note that the last date for MET 2021 slot booking is 3rd June.

As per the official notice, there will be only one attempt for the MET 2021 exam for all the applicants.  All those candidates who were eligible to book slots for MET 2021 during Phase 1 (16 – 20 April) are eligible to book slots for Remote Proctored Test (RPT) without any additional payment.

 The students who qualify the Manipal entrance test will be eligible for admission to the undergraduate courses offered by the university.

Slot booking started for Remote Proctored Test

 The academy has also started slot booking for online remote proctored test.  Already registered candidates can now book their MET slots on the official website manipal.edu.  Applicants will need their application number and password for MET slot booking 2021.  Note that the last date for MET 2021 slot booking is 3rd June.

 As per the official notice, there will be only one attempt for the MET 2021 exam for all the applicants.  All those candidates who were eligible to book slots for MET 2021 during Phase 1 (16 – 20 April) are eligible to book slots for Remote Proctored Test (RPT) without any additional payment.

how to apply for mate 2021

 1- Register on the official website with necessary details and contact number, email id.

 2-Login again with the system-generated credentials.

 3-Fill Manipal MET 2021 Application Form.

 4-Select the program.

 5-Review and submit the application.

How to book slot for MET 2021?

 1-Visit the official website of MET 2021

 2-Log in to OTBS (Online Test Booking System) using Application Number and Password

 3- Click on “Book a Seat” button

 4-Choose the preferred date and time for MAT 2021

 5-Confirm the selected slot.

Manipal Academy of Higher Education has also released the admit card or hall ticket for MET 2021 on the official website manipal.edu.  Note that only candidates who have booked MET 2021 slot can download the admit card.