- www.aptech.com
- www.harvard.edu
- www.ias.org
- www.berkeley.edu
- www.indiaedu.com
- www.buckleyourshoe.com
- www.intelsyseducation.com
- www.careerlauncher.com
- www.chemketaonline.com
- www.kaplancollege.com
- www.chetanapublications.com
- www.mastertutor.com
- www.mit.edu
- www.classteacher.com
- www.competitionmaster.com
- www.myshala.com
- www.cornell.edu
- www.nativechild.com
- www.discoveryschool.com
- www.netprotraining.com
- www.ed.gov
- www.netvarsity.com
- www.educationplanet.com
- www.niit.com
- www.educationtimes.com
- www.onlinevarsity.com
- www.educationworld.com
- www.petersons.com
- www.education-world.com
- www.pinkmonkey.com
- www.eduplace.com
- www.schoolcircle.com
- www.egurucool.com
- www.shiksha.com
- www.englishpractice.com
- www.sparkinglearning.com
- www.entranceguru.com
- www.umich.edu
- www.esaras.com
- www.unc.edu
- www.fluentzy.com
- www.upenn.edu
- www.free-ed.net
- www.utexas.edu
- www.funbrain.com
- www.wisc.edu
- www.gurukulonline.com
- www.zeelearn.com
शैक्षणिक-अपडेट
SSC Result 2021: इ 10 वी मूल्यमापन Excel sheet 2021 [ SSC Result]
इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणार आहे. यासाठी शिक्षक वर्गाला आता विद्यार्थी मूल्यांकनाचे काम वेळेत करून SSC बोर्डाला पाठवावे लागणार आहे.त्यांचे हे काम सोपे होण्यासाठी आम्ही उपयुक्त अशी मूल्यमापन ( SSC Result ) Excel sheet आपणाला देत आहोत.
इ 10 वी मूल्यमापन Excel sheet 2021 [ SSC Result]
वैशिष्ट्ये :-
या एक्सल शीटची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत.
🔘 SSC बोर्ड च्या डॅश बोर्ड मध्ये भरण्यासाठी उपयुक्त Excel शीट!
🔘 9 वीच्या 100 गुणांचे रूपांतर 50 मध्ये आपोआप होते
🔘 10 वी लेखी परीक्षेचे 80 गुणांचे रूपांतर 30 मध्ये आपोआप होते
🔘 एकूण गुण आपोआप बेरीज होते
🔘 श्रेणी विषयांचे सुद्धा गुण भरून श्रेणी आपोआप निघते
🔘 एकूण गुण ,पास नापास,टक्केवारी रिझल्ट आपोआप तयार होतो
1. इ 10 वी मूल्यमापन Excel sheet 2021 –
Excel शीट डाउनलोड करण्यासाठी कोपऱ्यातील बाणावर क्लिक करा 👉
2. इ 10 वी मूल्यमापन Excel sheet 2021 – 2
Excel शीट डाउनलोड करण्यासाठी कोपऱ्यातील बाणावर क्लिक करा 👉
इ 10 वीच्या वर्गशिक्षक / शिक्षकांसाठी उपयुक्त आहे कृपया शेअर करा.
- हेही वाचा : इयत्ता अकरावी प्रवेशसाठी CET ची तयारी कशी कराल ?
MPSC EXAM 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी घोषणा, पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) पदासाठी शारीरिक चाचणीस 60 गुण असतील तरच उमेदवारास मुलाखत देता येणार.
शैक्षणिक अपडेट्स : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) , महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट – ब ( मुख्य ) स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या शारीरिक चाचणीची सुधारित मानके यांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक ( PSI मुख्य ) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकामध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती . त्यानुसार मानकात करण्यात आलेल्या सुधारणा एक परिपत्रक काढत जाहीर केल्या. या सुधारित मानके पुढीलप्रमाणे असतील यामध्ये –
1.शारीरिक चाचणीचे गुण आर्हताकारक करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण ( म्हणजे ६० गुण ) आवश्यक असतील तरच तो उमेदवारास मुलाखतीस पात्र असेल.तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता / अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही .
२ . तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणाची बेरीज अपूर्णाकात असल्यास तो अपूर्णाकातच ठेचून , शारीरिक चाचणीचा निकाल तपार करण्यात येईल .
३ . पोलीस उपनिरीक्षक ( मुख्य ) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे .
शारीरिक चाचणीचा तपशील :
CBSE Class 12 Board Exam 2021: जुलै-ऑगस्टमध्ये होणार परीक्षा,तर सप्टेंबरमध्ये निकाल.!
शैक्षणिक अपडेट्स : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता सीबीएसई 12 वीच्या परीक्षेच्या बाबतीत परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा फार काळजीपूर्वक विचार करावा लागणार आहे. भारत सरकारचे केंद्रीय शिक्षणमंत्री ( Education Minister of India ) रमेश पोखरीयल निशंक यांच्या सुचणे नुसार यासाठी सर्व राज्य शिक्षण विभागाकडून सूचना मागविल्या आहेत . केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) नियोजना नुसार सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षा 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान घेतली जाण्याची शक्यता आहे. यासाठी सीबीएसई बोर्डाने दोन प्लान तयार केले असून त्यानुसार परीक्षा घेतल्या जातील.( education minister of india)
सीबीएसई परीक्षा मंडळाचे परीक्षा प्लान
परीक्षा प्लान एक नुसार कोविड च्या दुसर्या लाटेचा वाढता धोका लक्षात घेता सीबीएसई, सीआयएससीईसह विविध राज्यांच्या बोर्ड परीक्षा व इतर प्रवेश परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्या जात आहेत. अशा परिस्थितीत राज्यांची परिस्थिती लक्षात घेता आवश्यक विषयांसह बारावीच्या छोट्या स्वरूपात परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. तथापि, दिल्ली सरकारने स्पष्ट केले आहे की बोर्ड परीक्षा आणि ड्युटीवर तैनात शिक्षकांना प्रथम लसीकरण करायला हवे, तरच बोर्ड परीक्षा घेण्यात याव्यात.
परीक्षा कालावधी व विषय नियोजन
बोर्ड परीक्षा फक्त काही प्रमुख विषयांसाठी घेण्यात याव्यात. याशिवाय परीक्षेचा कालावधी 3 तासांऐवजी १. 1.5 तास करण्यात यावा. शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत बहुतेक राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी नंतरच्या पर्यायाला पाठिंबा दर्शविला. तसेच एका पर्यायानुसार 1.5 तास किंवा 90-मिनिटांच्या परीक्षेची परीक्षा पद्धत भिन्न असेल. यात फक्त एमसीक्यू प्रश्न असतील जेणेकरुन विद्यार्थी दिलेल्या वेळेत परीक्षा पूर्ण करू शकतील. सीबीएसईच्या एका सूत्रानुसार ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या शाळांमध्ये घेतली जाईल आणि त्यांना एका भाषेचा विषय आणि तीन निवडक विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागेल.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा 2021 सर्व सावधगिरीने राहील मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सीबीएसई बोर्डाची परीक्षा 2021 सर्व कोविड -19 सुरक्षा प्रोटोकॉलद्वारे घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळी सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचे पालन केले जाईल. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, व्यवसाय अभ्यास, लेखा, भूगोल, अर्थशास्त्र आणि इंग्रजीचा समावेश आहे. हे असे विषय आहेत जे भविष्यात विद्यापीठांमध्ये गुणवत्ता प्रवेश प्रक्रियेस मदत करतील.
SSC EXAM 2021: बारावीची परीक्षा घेणे शक्य, मग दहावीची का नाही? हायकोर्टाची सरकारला विचारणा.
शैक्षणिक अपडेट : दहावीच्या परीक्षा घेण्याबाबत लवकर निर्णय घ्या, नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असे आज हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला सुनावले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थी पास करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णया विरुद्ध प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात यांचीका दाखल केली असून, त्याला अनुसरून कोर्टाने आज सुनावणी दरम्यान सरकारला खडे बोल सुनावले.
बारावीच्या परीक्षा घेऊ शकता मग दहावीच्या का नाही? असा सवाल ही सरकारला हायकोर्टाने विचारला. दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करू शकत नाही, त्यामुळे बारावी परीक्षा बाबत जे नियोजन करणार असला त्याप्रमाणे दहावीच्या परीक्षा का घेऊ शकत नाही, या बाबीकडे हायकोर्टाचा रोख होता.
याचिका कर्त्याचे म्हणणे
दहावीच्या परीक्षा न घेता जर सरसकट दहावीच्या विद्यार्थ्यांना पास केले तर, खूप मोठा गोंधळ उडू शकतो. तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेवर ही यांचा परिणाम होऊ शकतो. प्रवेश प्रक्रियेत भ्रस्टाचार सुद्धा होऊ शकतो असे यांचीका कर्ते धनंजय कुलकर्णी यांचे म्हणे असून, दहावीची परीक्षा पास झाल्या शिवाय विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देवू नये असेही त्यांनी याचिकेत मागणी केली आहे.
आता या परिस्थिती राज्याचा शालेय विभाग, परीक्षा मंडळ किंवा राज्य सरकार काय भूमिका मांडणार बारावी प्रमाणे दहावीच्या पण परीक्षा होणार का? हायकोर्टात परीक्षा मंडळ काय बाजू मांडणार या सगळया गोष्टी कडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.
सध्या परीक्षा मंडळाकडून मूल्यांकन आराखडा बनवून तो शासनाला मंजुरीला देणार असल्याचे सोमवारी हायकोर्टात मंडळाच्या वकिला कडून सांगण्यात आले होते. तसेच सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिबा म्हणून विद्यार्थ्यांकडून मध्यस्थी याचिका दाखल करण्यात आली होती. या सगळ्या याचिकांवर लवकर निर्णय अपेक्षित.
दहावी परीक्षा नकोच ! विद्यार्थ्यांकडून हायकोर्टात मध्यस्थी याचिका दाखल.
शैक्षणिक अपडेट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा शासनाने रद्द केली, याविरुद्ध प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र आता विद्यार्थी संघटना ही परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाला पाठींबा देण्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. सरकारच्या या निर्णयाला पाठींबा म्हणून विद्यार्थ्यांनी हायकोर्टात ” मध्यस्थी ” याचिका दाखल केली आहे.
दरम्यान सोमवारी हायकोर्टात कुलकर्णी यांच्या याचिकेवर सुनावणी झाल्या नंतर, आज पुन्हा या सगळ्या याचिकावर सुनावणी होणार आहे. परीक्षा रद्द करण्यासाठी परीक्षा मंडळ आपली बाजू मांडेल.
दहावी परीक्षा होणार की रद्द होणार यावर आज अंतिम निर्णय येणार आहे. दहावी परीक्षा रद्दच्या विरोधात याचिका दाखल झाल्या नंतर शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गात संभ्रम निर्माण झाला असून, परीक्षा बाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
दहावी परीक्षा मंडळ स्थापन करणार मूल्यांकन समिती
दहावीची परीक्षा रद्द झाली तर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आराखडा ठरवण्यासाठी एक मूल्यांकन समिती स्थापन करण्यात येणार असून, सदर समिती मूल्यांकन आराखडा तयार करून शासनास सादर करेल. शासन मंजुरी नंतर मूल्यांकन प्रोसेस सुरु होईल असे सोमवारी परीक्षा बोर्डाकडून हायकोर्टात सांगण्यात आले.