शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील 14 हजार शाळा बंद होणार.

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! राज्यातील 14 हजार शाळा बंद होणार.

राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे. तसेच याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यातून राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा बंद होण्याची भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील. याशिवाय खेळ, संगीत, कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले आहे.

Maha Board Exam 2024 : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा, शिक्षण मंत्रालयाकडून निर्णय जाहीर.

Maha Board Exam 2024 : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा, शिक्षण मंत्रालयाकडून निर्णय जाहीर.

दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यांत घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून, विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. या बदलाचा विद्यार्थांनाचा मोठा लाभ होणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तके २०२४च्या सत्रात येणार आहेत. Maha Board Exam 2024

दरम्यान विद्याथ्र्यांना बोर्डाची परीक्षा देणे सुलभ व्हावे आणि अधिकाधिक चांगले गुण मिळविण्याची संधी मिळावी, या दृष्टिकोनातून बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अशा स्वरूपाच्या अभ्यासक्रमाची आखणी करून २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्यात येत असून, पुढील वर्षीच्या विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

अभ्यास पूर्ण झालेल्या विषयांचाच पेपर देण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्यांना दिले जाईल. याद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्यानुसार नजिकच्या काळात मागणीनुसार परीक्षा (ऑन-डिमांड) प्रणालीकडे वाटचाल करणे शक्य होणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयामुळे सध्याच्या बोर्डाच्या कठीण परीक्षा पद्धतीतून विद्यार्थ्यांची सुटका होणार असल्याचे बोलले जाते.

आगामी काळात देशात दहावी- बारावीच्या बोर्डाची परीक्षा अधिक सुलभ करण्यात येतील. परीक्षांमध्ये अनेक महिन्यांचे प्रशिक्षण आणि स्मरणशक्ती यापेक्षा कौशल्यांचे आकलन आणि यशाचे मूल्यांकन यावर भर दिला जाईल.

विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळणार – 

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. दोन्हींपैकी एक भाषा भारतीय असणे अनिवार्य आहे. अकरावी-बारावीसाठी विषयांची निवड विद्याशाखानिहाय नसेल. विद्यार्थी कोणत्याही विद्याशाखेतील विषय निवडू शकतील. त्यामुळे यापुढील काळात कला, वाणिज्य आणि विज्ञान यातील कोणत्याही एकाच विद्याशाखेतून अभ्यास करण्याचे बंधन असणार नाही. विद्याथ्र्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात येईल, असेही मंत्रालयाने सांगितले आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा होणार, आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद!

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा होणार, आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद!

राज्यात मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) कोणत्याही इयत्तेच्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अणुत्तीर्ण (Fail) करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार (New Education Policies) आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

पाचवी आणि आठावी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा (Annual Examination) घेण्यात येणार

सरसकट 8वीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आलाय. पाचवी आणि आठावी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा (Annual Examination) घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार आहे.

अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार

दरम्यान राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने (Department of Education) शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली असून, पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

शिक्षकांसाठी महत्वाचे! गुणवत्ता वाढीसाठी आता शिक्षकांसाठी दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार, दशसूत्रीमध्ये या मुद्द्यांचा समावेश.

शिक्षकांसाठी महत्वाचे! गुणवत्ता वाढीसाठी आता शिक्षकांसाठी दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार, दशसूत्रीमध्ये या मुद्द्यांचा समावेश.

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी महत्वाची शैक्षणिक अपडेट आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांसाठी दशसूत्री राबविली होती. तसेच आता जिल्ह्यातील गुरुजींच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, यासाठी शिक्षकांसाठी दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी दशसूत्री राबविण्याबाबत सीईओ स्वामी यांनी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांना सूचना दिल्या आहेत. या शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांसाठीच्या दशसूत्रीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शिक्षकांसाठीच्या दशसूत्री

  1. वर्गात शिकवत असताना मोबाईल बंद ठेवणे,
  2. वेळेचे बंधन,
  3. वाचाल तर वाचाल,
  4. शाळा परिसरातील स्वच्छ,
  5. व्यक्ती पेहराव,
  6. बोलण्यात सभ्यता,
  7. शाळेच्या आवारात धूम्रपान मनाई,
  8. सामाजिक उत्तरदायित्व,
  9. शाळा संस्कारक्षम करणे,
  10. शाळा परिसर पर्यावरण वातावरण तयार करणे,

हेही वाचा-

अशा मुद्यांचा समावेश दशसूत्रीमध्ये करण्यात आला आहे. शाळेच्या अस्तित्वावरच शिक्षकांचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे शिक्षकांची गुणवत्ता वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी आता दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार

पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ! आता इतकी मिळणार शिष्यवृत्ती रक्कम.

पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ! आता इतकी मिळणार शिष्यवृत्ती रक्कम.

राज्यात परीक्षा मंडळाकडून इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून एक ठराविक रक्कम दिली जात असते. यंदा पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रतिवर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता २० हजारपेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.

पाचवी नंतर तीन वर्ष आणि आठवीनंतर दोन वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या १३ वर्षांत यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यास दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते. सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रतिवर्ष, तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्ती देण्यात येईल.

पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ! आता इतकी मिळणार शिष्यवृत्ती रक्कम.

 

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! दप्तराचे ओझे कमी होणार, तीन महिन्यांसाठी एकच पुस्तक मिळणार

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! दप्तराचे ओझे कमी होणार, तीन महिन्यांसाठी एकच पुस्तक मिळणार

राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना एकात्मिक पद्धतीने चार भागांत पुस्तके वाटप होणार आहेत. सर्व विषयांचा एकत्र समावेश असलेले एक पुस्तक तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी असेल. पाठ्यपुस्तकांतच वह्यांची पानेही दिलेली आहेत.

दरम्यान शाळांना ३० जूनपासून सुरवात होणार आहे. स्थानिक स्वराज्य पाठ्यपुस्तकाचे वाटप होणार आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना नव्या रचनेत पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या तीन-तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आली आहे. यानुसार वर्षभरासाठी एकूण चार पुस्तके आहेत.

यंदा पुस्तकातच वही असणार

पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांच्या पानांचाही समावेश करण्यात आल आहे. माझी नोंद या शीर्षकाखाली ही पाने आहेत. या पानांचा वापर २१ प्रकारच्या नोंदी करण्यासाठी वापर करता येणार आहे.

समूह साधन केंद्रावरून शाळांना पुस्तकांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पुस्तकांचे वाटप करण्यासह अन्य महत्त्वाच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.