शाळांच्या संचमान्यतेसाठीची ‘आधार’ची सक्ती अखेर शिथिल, शिक्षकांच्या नोकऱ्यांवरील संकट अखेर टळले

शाळांच्या संचमान्यतेसाठीची 'आधार'ची सक्ती अखेर शिथिल, शिक्षकांच्या नोकऱ्यांवरील संकट अखेर टळले

राज्यातील अनुदानित शाळांची संचमान्यता बाबत शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनुदानित शाळांमध्ये १३ लाखांहून अधिक आधार कार्ड आणि त्याबाबत विसंगती आढळल्या आहेत. शेकडो शाळांची संचमान्यता आता केवळ विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांच्या हजेरीच्या तपासणीवरून केली जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संस्थाचालकांच्या दबावापुढे संचमान्यतेसाठी ‘आधार’ची सक्ती शिथिल करण्याचा निर्णय शासनकडून घेतला आहे.

संचमान्यतेमध्ये आता सरसकट विद्यार्थ्यांची नोंदणी होणार

संचमान्यतेमध्ये आता सरसकट विद्यार्थ्यांची नोंदणी होणार असल्याने हजारो शिक्षकांच्या नोकऱ्याही सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील शाळांमधील किमान ८० टक्के विद्यार्थ्यांचे ‘आधार’ वैध असल्याचे विचारात घेऊन शाळांची अंतरिम संचमान्यता करण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांच्या नावातील तफावत किंवा अन्य कारणांमुळे ते अवैध ठरले आहेत. काही विद्यार्थ्याकडे आधार कार्डच नाही; तरीही ते शाळेत येत आहेत. त्यांना संचमान्यतेत गृहीत न धरल्यामुळे त्याचा फटका शिक्षकांच्या मंजूर पदांना बसत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची संख्याही संचमान्यतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जुळलेले नाही; परंतु त्यांची नोंद शाळांमध्ये आहे त्यांची तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख भेट देऊन करणार असल्याचे विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची शाळेतील नियमित हजेरी ग्राह्य धरून संचमान्यता केली जाणार आहे. त्यांचे आधार कार्ड का काढले नाही, याची मात्र चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे अनुदानित, सरकारी आदी शाळांमधील एखादा विद्यार्थी स्टुडंट पोर्टलवर ‘डुप्लिकेट’ दिसत असल्यास तो कोणत्या शाळेत आहे, हेही तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

SSC Result 2023 Live : 10वीचा निकाल जाहीर, येथे पहा ऑनलाईन निकाल.

 

10वी बोर्ड निकाल 2023 जाहीर

SSC Result 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल (2 जून) जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईट्सवर प्रसिद्ध केला जाणार आहे. 10th Board Exam Result through Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education

महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊनही निकाल जाहीर केला गेला आहे. दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली होती. या दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते.

SSC Result 2023 खालील लिंकवर पाहा:

1) mahresult.nic.in

2) ssc.mahresults.org.in

3) sscresult.mkcl.org

 

जिल्हा परिषद मार्फत १०० गावांमध्ये ‘एलकेजी’, ‘यूकेजी’ वर्ग सुरु होणार.,इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश न घेता चिमुकल्याना मिळणार इंग्रजीचे शिक्षण.

 

जिल्हा परिषद मार्फत १०० गावांमध्ये 'एलकेजी', 'यूकेजी' वर्ग सुरु होणार.,इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश न घेता चिमुकल्याना मिळणार इंग्रजीचे शिक्षण.

ग्रामीण भागाच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला ओढा आणि जिल्हा परिषद शाळेतील घातलेली पटसंख्या याचा विचार करून आता जिल्हा परिषद मार्फत १०० गावा मध्ये मोफत ‘एलकेजी’, ‘यूकेजी’ चे वर्ग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आहे त्यामुळे आता चिमुकल्याना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश न घेता ‘इंग्रजीचे धडे दिले जाणार आहेत.

१०० गावांमध्ये पहिल्या टप्प्या टप्प्याने हे शिक्षण सुरु केले जाणार

शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही माध्यमाकडे पालकाचा काल्याचे या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात चिमुकल्यांना त्यांच्याच गावात एलकेजी केजीचे मोफत शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. दहा १५ हजार लोकसंख्या विद्यातील १०० गावांमध्ये पहिल्या टप्प्या टप्प्याने हे शिक्षण सुरु केले जाणार आहे. अंगणवाडी मध्ये मुलाचे पोषण आरोग्य, बालसंगोपन यालाच दिले जाते. अंगणवाडीसह इतर मुलांना आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एलकेजी केजीच्या वर्गातून दिले जाणार आहे.

कृती आराखडा तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर

कृती आराखडा तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. असा प्रयोग करणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील पहिलंच असणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना विशेषत खेती शिक्षकांना एक-दीड तास अगोदर शाळेचे लागणार आहे. दुसरीकडे आवश्यक ठिकाणी मानधनावर शिक्षक नेमले जाणार आहेत.

मुलांना मिळणार मोफत ‘इंग्रजी’चे शिक्षण…

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जो अभ्यासक्रम ‘एलकेजी’, ‘यूकेजीच्या वर्गाला शिकवला जातो, तोच अभ्यासक्रम आता जिल्हा परिषदेचे शिक्षक १०० गावातील चिमुकल्यांना शिकवतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीला येणाऱ्या मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा, हातावरील पोट असलेल्या पालकांच्या मुलांना इंग्रजी शाळांप्रमाणेच मोफत शिक्षण मिळावे, यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नियोजन केले आहे. त्यातून पालकांवर कोणताही आर्थिक भुर्दंड येणार नाही. घराजवळच मुलांना झेडपीतर्फे इंग्रजीचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. ‘एलकेजी’, ‘यूकेजी’चा अभ्यासक्रम आता शासनाने निष्ठित केला आहे.

लोकसंख्येच्या १०० गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एलकेजी, युकेजीचे वर्ग सुरू केले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर गावांमध्येही तसा प्रयोग होईल. त्यातून ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक बचत होईल आणि जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सुद्धा वाढेल

दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नेमणूक होणार

ज्या गावांमध्ये ‘एलकेजी’, ‘यूकेजी’साठी विद्यार्थी जास्त असतील, तेथे चाटी तत्त्वावर शिक्षक विशेषतः महिला शिक्षक नेमला जाणार आहे. दरमहा १५ हजारांपर्यंत त्यांना मानधन दिले जाणार आहे. तो खर्च ग्रामपंचायत निधी वित्त आयोगातील शिक्षणासाठी राखीव ठेवलेला निधी शालेय शिक्षण समित्यांकडील निधी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील निधी, सीएसआर फंड किंवा झेडपीच्या सेस फंडातून केला जाणार आहे. दररोज सकाळी दोन-तीन तास त्या चिमुकल्यांना अंगणवाडी किंवा झेडपीच्या शाळांमध्ये अंक व अक्षर ओळख, उजळणी, चौदाखडी, एबीसीडी असे पायाभूत शिक्षण दिले जाणार

यंदा शाळांचा निकाल १ मे ऐवजी ‘या’ तारखेला होणार जाहीर, शिक्षण संचालकाचे परिपत्रक जारी.

यंदा शाळांचा निकाल १ मे ऐवजी 'या' तारखेला होणार जाहीर, शिक्षण संचालकाचे परिपत्रक जारी.

राज्यात जर वर्षी १ मे रोजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांत ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करून शैक्षणिक वर्षाचा निकाल व गुणपत्रक वाटप केले जाते. मात्र यंदा १ मे ला प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळाचा निकाल लागणार नाही. त्याऐवजी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी/ पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे.

तसेच, निकालासोबत उपक्रम / कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा असे परिपत्रक शिक्षण संचालकाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.

शिक्षण संचालक परिपत्रक
राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत संदर्भिय क्र. १ वरील शासन निर्णयानुसार तपशिलवार सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या संदर्भिय क्र. २ वरील पत्रान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. उक्त सूचनांमध्ये सुट्टीचा कालावधी, शाळांचे निकाल जाहीर करणे, सन २०२३ २४ चे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादीबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ६ मे, २०२३ रोजी आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे.

9. दिनांक १ मे, २०२३ रोजी ‘महाराष्ट्र दिन’ सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात यावा.

२. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी/ पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे. तसेच, निकालासोबत उपक्रम / कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा.

३. संदर्भिय क्र. १ वरील शासन निर्णय आणि संचालनालयाच्या संदर्भिय क्र. २ वरील पत्रामध्ये दिलेल्या सूचनांनुसार शाळांच्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही…

यंदा शाळांचा निकाल १ मे ऐवजी 'या' तारखेला होणार जाहीर, शिक्षण संचालकाचे परिपत्रक जारी.

शिक्षकांसाठी महत्वाचे ! बदली झालेल्या शिक्षकांना “या” तारखेपर्यंत नवीन शाळेवर रुजू होण्याचे आदेश.

शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार नसल्याचे स्पष्ट!

शिक्षकांसाठी महत्वाचे ! बदली झालेल्या शिक्षकांना "या" तारखेपर्यंत नवीन शाळेवर रुजू होण्याचे आदेश.

प्राथमिक शिक्षकांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नवीन धोरणानुसार बदली झालेल्या शिक्षकांना येत्या १५ मेनंतर जुन्या शाळा सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नवीन शाळेवर रुजू होण्यासाठी सर्व शिक्षकांना ३१ मेची अंतिम मुदत देण्यात आली आहे. परिणामी बदल्यांबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. यामुळे यंदा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

कोरोना महासाथ, शिक्षकांच्या बदल्यांच्या नवीन धोरणांची अंमलबजावणी आणि या बदल्यांसाठी नव्याने विकसित करण्यात आलेली संगणकीय प्रणाली यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या झाल्या नव्हत्या. बदल्यांबाबतच्या नव्या धोरणानुसार यंदा पहिल्यांदाच जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरुपी एकाच शाळेत नोकरी करता येणार, महाराष्ट्र सरकारच नवीन धोरण

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरुपी एकाच शाळेत नोकरी करता येणार, महाराष्ट्र सरकारच नवीन धोरण

सरकारी शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचं झंझट कायमचं संपवाण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. खासगी शाळांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरुपी एकाच शाळेत नोकरी करता येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून सरकारी शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचं झंझट कायमचं संपणार आहेत, कारण जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याच होऊ नयेत, यासाठी नवं धोरण करण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले आहेत.

संदर्भात शिक्षण मंत्री किती सरकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार, शिक्षकांवरील बोजा कमी व्हावा, त्याचबरोबर शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा करावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वांचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लावून राहिले आहेत.

दरम्यान शिक्षकांच्या बदल्या न करण्याचं धोरण राज्य सरकार का आणतंय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळं शिक्षक कायम त्रासलेले असतात. या त्रासातून शिक्षकांना कायमचा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी व्हावा, यासाठी हे धोरण आखलं जातंय. माध्यमिक आणि खासगी शाळांमध्ये आयुष्यभर शिक्षक एकाच शाळेत शिकवतात. त्याच धरतीवर शिक्षकांना एकाच शाळेत थांबून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता येईल, असं शालेय शिक्षण खात्याला वाटतं. मात्र या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.