राज्यातील शिक्षणसेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शिक्षणसेवकांच्या मासिक मानधनात वाढ करणार असल्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. शिक्षणसेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्यासंबंधीचा जीआर काल (ता. 7 फेब्रुवारी) काढण्यात आला आहे.
राज्य सरकारने केलेल्या या घोषणेनंतर राज्यातील हजारो शिक्षणसेवकांच्या मानधनात झालेली वाढ ही 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. मानसिक मानधनामध्ये झालेली ही वाढ लागू झाल्याने शिक्षणसेवकांच्या मानधनात किती वाढ होणार आहे, राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांचं मानधन यापूर्वी 6 हजार रुपये होते ते आता 16 हजार रुपये केलं आहे.
राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षणसेवकांचं मासिक मानधन 8 हजार रुपयांवरुन थेट 18 हजार रुपये झालं आहे. तर राज्य सरकारने उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणसेवकांचं यापूर्वी असलेलं मासिक मानधन 9 हजार रुपयांवरून 20 हजार रूपये केलं आहे.