तिसरीच्या विद्यार्थाची वार्षिक परीक्षा होणार, राज्यात “केरळचा शैक्षणिक पॅटर्न” राबविला जाणार.

इयत्ता तिसरी विद्यार्थी

शैक्षणिक अपडेट : राज्यात शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने सरकार राज्यत शिक्षणाचा ‘ केरळ पॅटर्न ‘ राबविण्याच्या तयारीत आहे. सदर पॅटर्न नुसार पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थाची वार्षिक सराव परीक्षा सुरू कारण्यात येणार आहे . त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील . सध्य शैक्षणिक पद्धती नुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धती लागू नसून, मूल्यांकन पद्धतीचा वापर करुन विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात पाठविले जात आहे .

शिक्षण विभागाच्या माहिती नुसार सध्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण राज्यातील अधिकारी राजस्थान , गुजरात आणि केरळमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत असल्याची माहिती शिक्षण संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र व इतर राज्यातील शैक्षणिक फरक काय?

महाराष्ट्रात ८ वी पर्यंतच्या परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत ; पण शेजारच्या राजस्थानमध्ये ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डामार्फत परीक्षा घेतल्या जात आहेत . तर गेल्या वीस वर्षांपासून पंजाबमध्ये परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची बँक आहे . केरळमध्येही इंग्रजी शिक्षणासाठी खासगी शिक्षण संस्थांना पसंती दिली जाते . इंग्रजीसह स्थानिक भाषेमधून शिक्षण घेण्याचे प्रमाण अधिक आहे ; पण तितकाच विश्वास सरकारी शिक्षणावरही आहे . त्यामुळे तेथील प्राथमिक विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत आघाडीवर आहेत .

दरम्यान तिसरी पासून परीक्षा पद्धतीचा अवलंब झाला तरी सराव परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास किंवा गुण कमी मिळाल्यास विद्यार्थांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल , पण त्याला पुढील वर्गात जाण्यापासून रोखले जाणार नाही , असेही पगारे यांनी स्पष्ट केले .

केरळ शैक्षणिक पॅटर्न नेमका काय आहे?

१ ) प्राथमिक शाळा चालविण्याचे व नोकरभरतीचे अधिकार ग्रामपंचायतींना .
२ ) माध्यमिक शाळांचे अधिकार जिल्हा परिषदांना .
३ ) प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा .
४ ) कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा .

५ ) दर दहा वर्षांनी अभ्यासक्रमात बदल .
६ ) प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक , वडील आणि माता असोसिएशन .
७ ) विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी कुटुंबश्री योजना .
८ ) विभागीय स्तरावर कला आणि विज्ञान मेळावा .

९ ) विद्यार्थी लेखकास प्रोत्साहन .

१० ) जनावरांच्या डॉक्टरांच्या नियुक्तीचे अधिकारही ग्रामपंचायतींना .

SSC HSC Exam 2023 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे, यंदाच्या परीक्षेबाबत बोर्डाकडून महत्वपूर्ण बदल.

SSC HSC exam 2023

SSC HSC Exam 2023 : राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा संदर्भात नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे .
कोरोनामुळे माघील दोन वर्षे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पद्धतीमध्ये अनेक बदल करत विदयार्थ्यांना अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. त्या सर्व सवलती आता रद्द करत, दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार आहेत.

बारावीची परीक्षा 21 फेब्रवारीपासून, तर दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरु होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही बोर्डाने निश्चित केले आहे. राज्यातील दहावीचे 16.27 लाख, तर बारावीतील 14.43 लाख, असे सुमारे 31 लाख विद्यार्थी 6 हजार केंद्रांवर ही परीक्षा देतील. 1 फेब्रुवारीपासून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, कोरोना काळात विद्यार्थ्यांना अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदाच्या परीक्षेत या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाच्या परीक्षेत नेमके काेणते बदल असतील, हे जाणून घेऊ या..

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षामध्ये बोर्डाने केलेले बदल

दोन पेपरमध्ये एक दिवस सुटी देण्यात येऊ शकते, त्यामुळे बोर्डाच्या सध्याच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. परीक्षेची सुरवात वेळेवर होईल, मात्र काही पेपर मागे-पुढे होऊ शकतात.

तसेच यंदाची परीक्षा ही पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा आसनार आहे. कोविड काळात सदर अभ्यासक्रम 25 टक्के कमी केला होता. आता संपूर्ण 100 टक्के अभ्यासक्रमावर दहावी-बारावीची परीक्षा होणार.

याशिवाय विद्यार्थ्यांना 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव देण्यात आला होता. तोही रद्द होणार आहे. तसेच, 60-40 गुणांसाठी असलेली अधिकची 15 मिनिटांची सवलतही मिळणार नाही. मात्र, दिव्यांगांना असणाऱ्या सवलती कायम असतील.

कोविड काळातील परीक्षासाठीची ‘होम सेंटर’ रद्द

कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे माघील वर्षी गावोगावच्या शाळा- महाविद्यालयात दहावी-बारावीची परीक्षा झाली होती. मात्र, यंदा केंद्र शाळां वरतीच परीक्षा होणार आहेत. कोविड काळातील परीक्षासाठीची ‘होम सेंटर’ रद्द होणार आहेत.

ऑनलाईन शिक्षक बदली 2022 – शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्यांबाबत मोठी अपडेट.

ऑनलाईन शिक्षक बदली 2022 - शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्यांबाबत मोठी अपडेट.

राज्यात शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे. सदर बदल्यांची प्रक्रिया 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे संबंधित विभागकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात तांत्रिक बाबी या एप्रिल महिन्यात पूर्ण कारण्यात आल्या होत्या. शासनाकडून दिलेल्या निर्देशनुसार जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांनी 7 नोव्हेंबरपर्यंत आपली माहिती सादर केली आहे.

पुढील प्रोसेस म्हणून आता 24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग भाग एकमध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता लागणार आहे.

ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार 30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.

दरम्यान शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहणार आहे . तसेच विशेष संवर्ग भाग-दोनसाठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत आहे. या दरम्यान शिक्षकांना त्यांचे त्यात 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांची बदली होणार नाही. त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहणार आहे .

या शिक्षकांची बदली होणार नाही…

सदर ऑनलाईन बदली प्रोसेस मध्ये भाग घेऊन प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही. बदल्याची ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी बदल्यांचे आदेश प्रकाशित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाचा मोठा निर्णय,” हे ” विद्यार्थी बोर्ड परीक्षेला मुकणार

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाचा मोठा निर्णय," हे " विद्यार्थी बोर्ड परीक्षेला मुकणार

शालेय विभागाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता. मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती असणं बंधनकारक असून, याची अंमलबजावणी काटेकोरपणे कारणे शाळांना बंधनकारक कारण्यात आले आहे.

कोविड नंतर शाळा – कॉलेज पूर्ववतपणे झाल्या असून, त्यामुळे सर्व नियम अटी आता शाळा प्रशासनाला व विद्यार्थ्यांना पाळावे लागणार आहे. शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील. सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने तसे आदेश दिले आहेत.

शालेय विभागाने या संदर्भात प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना सूचना निर्गमित केल्या आहेत. शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी. विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय, आता पुस्तकांसोबतच वह्या मोफत देण्याची घोषणा ..!!

Dipak kesrakar

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच वह्याही मोफत देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे . यामुळे पालकांचा आर्थिक भार आणखीन कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

सध्या बाजारातील वाह्यांचे दर पाहता पालकांना आपल्या मुलांसाठी दरवर्षी वह्या घेणं आर्थिक दृष्टीने परवडत नाही . त्यामुळे आधी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी म्हटलं होतं. मात्र, सदर प्रोसेस सोयीस्कर नसल्याने आता विद्यार्थ्यांना थेट वह्या मोफत देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्राकडून कारण्यात आली आहे.

राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय अपडेट ..

सध्या राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनकडून जाहीर कारण्यात आला असून, त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत, या संदर्भात बोलताना केसरकर यांनी सांगितले की, राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी व अतिरिक्त शिक्षकांची माहिती घेतली जाईल. त्यानंतरच तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल.

दरम्यान राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद झाल्या, तरी तेथील विद्यार्थ्यांचे शेजारील जवळच्या शाळांमध्ये समायोजन केले जाईल. विद्यार्थ्यांना शाळा लांब पडत असल्यास त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री केसरकर यांनी दिली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कडून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती नवीन अपडेट्स

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेले वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती संदर्भात नवीन अपडेट्स आली आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती करताना काही प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी.

आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत देखील http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.