इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांना ATKT चा पर्याय उपलब्ध होणार ? शिक्षण विभाग मोठा निर्णय घेणार.

इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांना ATKT चा पर्याय उपलब्ध

शालेय शिक्षण विभाग इयत्ता तिसरी पासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापन करण्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार करीत आहे. सदर परीक्षा घेत असताना इयत्ता तिसरीपासून अंतिम परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना एटीकेटीचा पर्याय देता येईल का, याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. नुकतेच त्यांनी इयत्ता तिसरी पासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय विभागकडून घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी माध्यमांशी बोलत असताना, ‘शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही. यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी अंतिम परीक्षा देतात. मात्र, अनुत्तीर्ण होणार नसल्याने त्यांच्यामध्ये परीक्षांचे गांभीर्य नाही.

यावर उपाय म्हणून तिसरीपासून विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ लावली, तर त्यांना पुढच्या इयत्तेत पाठवून मागच्या काही विषयांची परीक्षा पुन्हा घेता येईल. यामुळे परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत कोणताही निर्णय घाई न घेता शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा घेतला जाईल हेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, इतके’ दिवस मिळणार सुट्ट्या…!

विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, इतके' दिवस मिळणार सुट्ट्या...!

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिवाळीत शाळांना दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान, तर माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र 20 ऑक्टोबरला संपेल, तर दिवाळीला सुरुवात वसुबारसेपासून (21 ऑक्टोबर) होणार आहे. त्यानुसार, प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या आहेत. तसेच, 6 नोव्हेंबरला रविवार असल्याने, 7 नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरु होतील.

माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान सुट्ट्या आहेत. 13 नोव्हेंबरला रविवार असल्याने 14 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील. या वेळापत्रकानुसार माध्यमिक शाळांना पाच-सहा दिवस जादा सुट्टी मिळणार आहे. विद्यार्थी-पालकांसोबतच शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्येही दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाण्याचे नियोजन करता येणार आहे.

विद्यार्थ्यांनाही मिळणार वर्षाला 6 हजार रुपये , शिंदे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! पात्रता निकष जाणून घ्या.

विद्यार्थ्यांनाही मिळणार वर्षाला 6 हजार रुपये ,

शिक्षण विभाग शाळेतील गळती कमी व्हावी किंवा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी विविध योजना शासना कडून केल्या जात असतात. आता आणखीन एक योजना विदयार्थ्यांसाठी चालू कारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी प्रवासभत्ता म्हणून दरमहा 600 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.या मध्ये सुट्ट्यांचे दिवस वगळून एकूण 10 महिन्यांसाठी 6 हजार रुपये एकरकमी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा कारण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे.

“या” विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

सदर योजना सुरु करीत असताना शासनाने लाभार्थी विद्यार्थी निकष ठरविले आहेत. या नुसार या योजनेचा लाभ सरसकट विद्यार्थ्यांना मिळणार नाही. ठराविक विद्यार्थ्यांना महिन्याला 600 रुपये मिळणार आहेत. ज्या शाळांची मान्यता रद्द झाली किंवा शाळा बंद पडली आहे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. त्यातील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नसतील, त्यांना प्रवासखर्च म्हणून दरवर्षी 6000 रुपये अनुदान एकरकमी बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे.

योजनेसाठीचे निकष खालीलप्रमाणे –

इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक किलोमीटर परिसरात, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर परिसरात उच्च प्राथमिक शाळा नसल्यास हे अनुदान दिले जाणार आहे.

शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच अनुदानाचा लाभ मिळणार आहे. शहरातील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

पीएफएमएस प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावर वाहतूक सुविधेसाठी हा निधी देण्यात येतो. आतापर्यंत दरमहा 300 रुपये अनुदान देण्यात येत होते. आता ते 600 रुपये करण्यात आले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2022-23 करिता अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

हे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार-बॅंक खाते लिंक करण्याचे काम सुरु आहे. ही मोहीम डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे, तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा सुरु करण्याचा राज्य सरकार निर्णय.

 

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे, तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा सुरु करण्याचा राज्य सरकार निर्णय.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिली. इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा माघील 10 वर्षांपासून बंद कारण्यात आल्या होत्या.आता पुन्हा नव्याने ह्या परीक्षा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित सातत्यपूर्ण सर्वंकष पद्धतीने मूल्यमापन केले जात होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांना नापास न करता थेट पुढच्या वर्गात प्रवेश दिला जात असतो. आता विद्यार्थ्यांना या परीक्षाना समोरे जावे लागणार आहे.

दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने राबविण्याचा सरकारचा विचार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. सध्या आपल्यकडे परीक्षा नसल्याने विद्यार्थी गुणवत्ता टिकून राहत नाही. त्यामुळे विद्यार्थी माघे पडत आहेत. इतर राज्याच्या क्रमवारीत महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात 9 व्या क्रमांकावर आहे. आपल्या राज्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न हवे आहेत.

दरम्यान सध्या एकशिक्षकी शाळांचे एकत्रीकरण करण्यात येणार असल्याचे सरकार कडून सांगण्यात येत आहे. या मध्ये कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचा समावेश आहे.

दिपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री झाल्यापासून विविध निर्णयाने सातत्याने शिक्षण खाते चर्चेत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या ग्रहपाठ बंद कारणे व विद्यार्थ्यांचे दप्तर ओझे कमी करण्यासाठी पुस्तकात लिखाणासाठी जागा देण्याचा निर्णय इत्यादीचा समावेश आहे.

जनगणना,निवडणुका नंतर आता शिक्षकांवर चहा वाटपाच्या नियोजनाची जबादारी… परिपत्रक जारी!

जनगणना,निवडणुका नंतर आता शिक्षकांवर चहा वाटपाच्या नियोजनाची जबादारी... परिपत्रक जारी!

शासनाच्या विविध उपक्रम किंवा महत्वाची कामे शिक्षक मंडळी कडून करून घेतली जातात. यामध्ये निवडणुकांची कामं किंवा जनगणनेच्या कामाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. मात्र आता चक्क शिक्षकांना चहा वाटपाच्या नियोजनाची जबादारी दिली असून या संदर्भातील एक परिपत्रक सुद्धा जारी कारण्यात आहे. सदर परिपत्रका नुसार शिक्षकांवर गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना चहा वाटपाच्या नियोजनाच्या कामची जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षकांना चहा हा एसटी आगारात वाटायचा आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत. सदर प्रकारावर अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून विरोधक या निर्णया बाबत सरकारवर कडाडून टीका करीत आहेत.

निर्णयाला शिक्षक संघटनांनी नोंदवीला आक्षेप….!

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर आगारात तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली आहे. दररोज तीन शिक्षक हे किमान आठ आठ तास एसटी आगारात ड्युटी करणार असून, राजापूर तालुक्यात जवळपास 850 शिक्षकापैकी 39 शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. हा निर्णय प्रांत आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांनी सांगितले आहे. मात्र, या निर्णयाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

जनगणना,निवडणुका नंतर आता शिक्षकांवर चहा वाटपाच्या नियोजनाची जबादारी... परिपत्रक जारी!

 

 

शिक्षकांना आनंदाची बातमी, सुप्रीम कोर्टाच्या “या” निर्णयाचा होणार फायदा!

शिक्षकांना आनंदाची बातमी, सुप्रीम कोर्टाच्या "या" निर्णयाचा होणार फायदा!

राज्यातील खासगी शाळांमधील कार्यरत शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रॅच्युईटी’च्या लाभा संदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या नुसार खासगी शाळेत शिकवणारे शिक्षकही कर्मचारी आहेत. कामाची 5 वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना ‘ग्रॅच्युईटी’चा लाभ दिलाच पाहिजे, असा महत्वपूर्ण निर्णय दिला कोर्टाने दिल्याने अनेक शिक्षक बांधवाना याचा लाभ होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने या बाबत आपले निरीक्षक नोंदवीले आहे. खासगी शिक्षण संस्थेत 10 पेक्षा अधिक कर्मचारी असल्यास, या त्यांनाही ‘पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अमेंडमेंट कायदा-2009’ लागू होतो. याबाबतची अधिसूचना 3 एप्रिल 1997 रोजी काढण्यात आली आहे. मात्र, अनेक शिक्षण संस्था आपल्या शिक्षकांना ‘ग्रॅज्युईटी’ देत नसल्याचे समोर आले होते.

दरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली.यानुसार अलाहाबाद, मुंबई, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश व छत्तीसगड येथे उच्च न्यायालयात खटले हरल्यानंतर खासगी शाळांनी 2009 च्या सुधारणांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. आता या निर्णयामुळे अनेक खाजगी शाळेतील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.