शैक्षणिक अपडेट : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, विद्यार्थ्यांच्या दप्तरा बाबत शासनाचा महत्वपूर्ण निर्णय….

शैक्षणिक अपडेट : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, विद्यार्थ्यांच्या दप्तरा बाबत शासनाचा महत्वपूर्ण निर्णय....

शैक्षणिक अपडेट : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करीत असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था याबाबत विचार विनिमय सुरु आहे.

पाठ्यपुस्तकातच लिखाणासाठी वहीचा पर्याय मिळाल्यास, विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे व विद्यार्थ्यांना नोटस् काढण्यासाठी स्वतंत्रपणे वही बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय, एकाच विषयाची किंवा संदर्भातील वेगवेगळी टिपणे काढण्यापासून विद्यार्थ्यांची सुटका होईल. पालकांचा वह्यांवर होणारा खर्चही वाचेल.
दिपक केसरकर , शिक्षणमंत्री

वर्षा गायकवाड यांनी एकात्मिक पुस्तक संकल्पना मांडली होती. या संकल्पनेत विविध विषयांचे धडे एकत्र करून त्याचे एकच पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो माघे पडत गेला, आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकाची विभागणी तीन भागांत करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, पुस्तकांची विभागणी केल्यानंतरही वह्यांच्या ओझ्याचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे तीन भागात विभागणी केलेल्या पाठ्यपुस्तकालाच वहीची पाने जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

National Scholarship 2023 : नॅशनल स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज सुरू , पहिली ते पदवीधर विदयार्थ्यांना करता येणार अर्ज!

National Scholarship 2023 : नॅशनल स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज सुरू , पहिली ते पदवीधर विदयार्थ्यांना करता येणार अर्ज!

National Scholarship 2023 : केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीचा कार्यक्रम ( National Scholarship programs ) जाहीर झाला आहे. विदयार्थ्यां आपले अर्ज Scholarship.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
या योजनेंतर्गत सरकार दर वर्षी पहिली ते पदवीपर्यंतची रक्कम देते . अखिल भारतीय शिष्यवृत्तीच्या मदतीने विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात . ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पात्र मुलांसाठी उपलब्ध आहे . या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थी प्रतिष्ठित विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये अभ्यास करू शकतात .आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती अत्यंत फायदेशीर आहे .

National Scholarship 2022 – 23

अर्ज कसा कराल? ( How to apply? )

  1. सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ scholarships.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल .
  2. त्यानंतर स्कॉलरशिपशी संबंधित योजना पोर्टलवर सुरू होतील . पुढच्या पानावर तुमच्यासमोर एक अॅप्लिकेशन फॉर्म उघडेल . फॉर्ममध्ये विचारलेली काही महत्त्वाची माहिती भरावी लागते .
  3. त्यानंतर बँकेशी संबंधित सर्व माहिती भरा . यानंतर लॉगइन आणि त्यानंतर मोबाइल नंबरवर ओटीपीचा पर्याय येईल . यानंतर तुमच्यासमोर शिष्यवृत्तीचा फॉर्म येईल .
  4. विचारलेली माहिती भरावी . त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा .

 

शिष्यवृत्तीसाठी अर्ज वेळापत्रक ( Application Schedule for Scholarships )

  • अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
    अंतिम मुदत – 30 सप्टेंबर 2022 पर्यंत खुली आहे .
  • अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना
    अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत खुली आहे .
  • मेरिट म्हणजे व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सीएस ओपन
    अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत खुली आहे
  • बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
    अंतिम मुदत – 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकते .

निवड पद्धती ( Selection Method )

  • राष्ट्रीय स्तरावरील या शिष्यवृत्तीत गुणवत्तेवर आधारित पहिल्या २०० गुणवंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे .
  • वेबसाइटवरील शिष्यवृत्तीनुसार अभ्यासक्रम आणि मिळालेल्या रकमा सांगण्यात आल्या आहेत शिष्यवृत्ती देणाऱ्या सर्वच संस्था सर्वांसाठी शिष्यवृत्ती देत नाहीत .
  • संस्थेने ठरविलेली टक्केवारी गाठणारे विद्यार्थी . त्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो .
  • स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अधिकृत वेबसाईट

अधिकृत वेबसाईट – Click Here

ऑनलाईन अर्ज – Click Here

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणसेवक, सहशिक्षक पदावर कार्यरत ५७६ उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठवले.

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणसेवक, सहशिक्षक पदावर कार्यरत ५७६ उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठवले.

राज्यातील जिल्हा परिषद , मनपा / नपा / नप / कटक मंडळे , खाजगी अनुदानित , अंशत : अनुदानित , प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणसेवक / सहशिक्षक पदावर कार्यरत ५७६ उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता ( टी.ई.टी. ) परीक्षा २०१ ९ ( परीक्षा दि . १ ९ जानेवारी , २०२० ) या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने सदर कार्यवाही कारण्यात आली आहे. या संदर्भात ( डॉ . दिनकर पाटील ) शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे -०१ यांचे कडून आदेश काढण्यात आले

महाराष्ट्र शिक्षक पात्रता ( टी.ई.टी. ) परीक्षा २०१ ९ ( परीक्षा दि . १ ९ जानेवारी , २०२० ) या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व शास्ती निश्चित करणे याबाबत आयुक्त परीक्षा परीषद , पुणे यांचेकडून दि . ०३.०८.२०२२ अन्वये ७८७४ अपात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली होती , ज्याअर्थी , शासन पत्र दिनांक १०.०६.२०२२ मधील मुद्दा क्र . ४ अन्वये सदर यादीतील परीक्षार्थी जि.प अथवा खाजगी अनुदानित / अंशत : अनुदानित / विना अनुदानित शाळेत कार्यरत असल्यास व सदर सेवेच्या अनुषंगाने त्यांना शालार्थ आयडी प्रदान केलेला असल्यास शिक्षण संचालक यांनी त्यांचे स्तरावरुन प्रथमतः सदर शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात यावेत असे निर्देश होते .

ज्याअर्थी , महाराष्ट्र शिक्षक पात्रता ( टी.ई.टी. ) परीक्षा २०१ ९ मधील ७८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने चौकशी अती त्यांना अपात्र केले आहे . सदर उमेदवारांची यादी दिनांक १०.०८.२०२२ नुसार महाआयटी मुंबई यांना नावानुसार व आधार क्रमांकानुसार मॅपिंग करण्यासाठी देण्यात आली होती .

महाआयटीकडून मॅपिंग करून प्राप्त यादीनुसार अपात्र उमेदवारांपकी ५७६ उमेदवार राज्यातील जिल्हा परिषद , मनपा / नपा / नप / कटक मंडळे , खाजगी अनुदानित , अंशत : अनुदानित , प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणसेवक / सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत आणि शालार्थ प्रणालीव्दारे वेतन अनुदान घेत आहेत . त्याअर्थी , शासन पत्र क्र . २०२२ / प्र.क्र . ४४ / टीएनटी -१ , दि .१० जून , २०२२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक १७.०८.२०२२ च्या संदर्भ ४ च्या आदेशान्वये उक्त प्रकरणी महाआयटी , मुंबई यांचेकडून प्राप्त यादीनुसार प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत व शालार्थ आयडी धारक सोबतच्या यादीतील एकूण ५७६ उमेदवारांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात आलेले आहेत .

उपरोक्त गोठविण्यात आलेल्या शालार्थ आवडी उमेदवारांची नावे माहे ऑगस्ट २०२२ च्या वेतन देयकामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता असल्याने सदरचे वेतन देयक रद्द करून संबंधिताचे नाव देयकातून वगळून माहे ऑगस्ट २०२२ चे वेतन देयक तयार करून अन्य कर्मचान्याचे वेतन अनुदान अदा करण्याची कार्यवाही करावी . तसेच शालार्थ आयडी गोठविण्यात आलेल्या उमेदवाराचे माहे ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाईन अथवा ऑफलाईन वेतन अनुदान अदा होणार नाही याची सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी .

सदर प्रकरणी उमेदवारांना वेतन अनुदान अथवा फरक देयक अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी . १. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व २. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद , सर्व ३. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व ४. प्रशासन अधिकारी , मनपा सर्व ५. अधीक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक ( प्राथमिक ) सर्व ६. मुख्याधिकारी / प्रशासन अधिकारी न.पा. / न.प / कटक मंडळे सर्व इत्यादीना सदर पत्रान्वय आदेश काढण्यात आले आहेत.

डाउनलोड परित्रकयेथे क्लिक करा 

शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागाकडून ” दशसूत्री ” जाहीर!

शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागाकडून " दशसूत्री " जाहीर!शैक्षणिक अपडेट : राज्यातील सरकारी शाळांच्या गुणवतेचा विषय नेहमीच चर्चेला जात असतो. यामध्ये जिल्हा परिषद शाळा व त्यातील शिकणा विद्यार्थी मध्यवर्ती असतो. आता पुन्हा हा मुद्दा शालेय विभागाने पुढे आणत शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी दशसूत्री शिक्षण विभागाकडून ” दशसूत्री ” जाहीर केली आहे. ही गुणवतेची दशसूत्री खालील प्रमाणे आहे.

 

 

शिक्षण विभागासाठी दशसूत्री 

  1. गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करणे ,
  2. स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार करणे ,
  3. आनंददायी व नावीन्यपूर्ण शिक्षण ,
  4. आरोग्यवर्धक व संस्कारक्षम शिक्षण ,
  5. तंत्रस्नेही / आयटीक्षम शिक्षण ,
  6. सुप्त गुण शोधून त्यास प्रोत्साहन,स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन / लेखक / कवी निर्मिती ,
  7. कौशल्य चिकित्सक विचार, सृजनशिलता सहयोग ,
  8. ज्ञानातील आधुनिकता ग्रहण करण्यासाठी ,शिक्षकांनी प्रयत्न करणे ,
  9. स्वावलंबन प्रवृतीला चालना व देशभक्ती , मातृपितृ भक्ती वाढविणे ,
  10. गुरुकुल पद्धतीला उजाळा देत शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती ही दशसूत्री देण्यात आली आहे .

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाची मोठी घोषणा.!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाची मोठी घोषणा.!राज्यातील सर्व इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाबाबत महत्वाची घोषणा शिक्षण विभागाकडून नुकतीच करण्यात आली आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला होता. शाळा बंद ठेवून ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षक मंडळी कडून कारण्यात आला. त्यावेळी शालेय विभागाने इयत्ता नुसार अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी कारण्यात आला होता.

शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 मध्येही पहिली ते बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम (पाठ्यक्रम) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झालाय. परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळा 15 जूनपासून ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता अभ्यासक्रमात सूट या वर्षी दिली जाणार नाही.

शालेय शिक्षण विभागाने नुकताच मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पहिली ते बारावीसाठी 100 टक्के अभ्यासक्रम लागू असणार आहे. शासनाने नुकतीच या निर्णयास मान्यता दिल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

SSC HSC EXAM 2022 : इ.१०वी आणि इ.१२वीच्या बोर्ड पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर

SSC HSC EXAM 2022 : इ.१०वी आणि इ.१२वीच्या बोर्ड पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीरSSC HSC EXAM 2022 : राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१०वी आणि इ.१२वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा बोर्डा कडून  घेण्यात येणार आहे . या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.

SSC HSC EXAM 2022 : इ.१०वी आणि इ.१२वीच्या बोर्ड पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर

SSC HSC EXAM 2022 : इ.१०वी आणि इ.१२वीच्या बोर्ड पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर