राज्य सरकार कडून नीट ( NEET ), जेईई ( JEE )स्पर्धा पूर्वपरीक्षेसाठी १५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन मार्गदर्शन , दररोज ६ जीबी इंटरनेटही मोफत.

राज्य सरकार कडून नीट ( NEET ), जेईई ( JEE )स्पर्धा पूर्वपरीक्षेसाठी १५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन मार्गदर्शन , दररोज ६ जीबी इंटरनेटही मोफत.महाज्योती प्रशिक्षण : राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘ महाज्योती मार्फत राज्यातील १५ हजार ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नीट ( NEET ) , जेईई ( JEE ) स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्य सरकार कडून महाज्योती अंतर्गत नीट ( NEET ), जेईई ( JEE ) स्पर्धा पूर्वपरीक्षेसाठी १५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कारण्यात येणार असून, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना दररोज ६ जीबी इंटरनेटही मोफत देण्यात येणार असल्याचे माहिती महाज्योतीचे संचालक प्रा . दिवाकर गमे यांनी दिली. महाज्योतीचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

१ मे रोजीपासून नोंदणी ( Registration ) सुरु.

१ मे रोजीपासून नोंदणी सुरु मार्च २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या व ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन २०२४ च्या जेईई , नीट परीक्षेची तयारी करण्यास इच्छुक ओबीसी व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर १ मे २०२२ पासून मोफत नोंदणी सुरू झाली आहे .

आवश्यक कागपत्रे – सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहेत.

  • शहरी भागातील विद्यार्थ्यांना मार्च २०२२ च्या दहावीच्या परीक्षेत ७० टक्के तर , ग्रामीण व आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण मिळणे आवश्यक .
  • विद्यार्थ्याने ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे शाळा , महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे बोनाफाईड सर्टिफिकेट , विद्यार्थी ओबीसी , व्हीजेएनटी , एसबीसी जात व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र.

१५ हजार विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट!

२०२४ साठी १५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण २०२२ च्या जेईई , नीट परीक्षेसाठी तीन हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मोफत टॅबसह प्रशिक्षण देण्यात आले .
२०२३ च्या नीट परीक्षेसाठी १० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे .
२०२४ साठी १५ हजार विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे .
जेईई , नीट परीक्षेची आवश्यक सर्व पुस्तके मोफत घरपोच पाठविली जाणार आहेत .
पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा ३१ हजार रुपयांप्रमाणे पाच वर्षे फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे .

बोगस क्रीडा प्रमाणपतत्राची होणार चौकशी! उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत शासना कडून आवाहन.

बोगस क्रीडा प्रमाणपतत्राची होणार चौकशी! उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत शासना कडून आवाहन.शासकीय नोकरीत खेळाडूंना ५% आरक्षण ठेवण्यात आले असून, या अंतर्गत अनेक खेळाडू उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ मिळावीला आहे. सध्या काही उमेदवारांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. शासकीय सेवेचा लाभ घेत सध्या कार्यरत आहेत. आशा उमेदवारांना सदर शासकीय विभागाकडून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र , बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

“बोगस क्रीडा प्रमाणपत्र , बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” नेमकी कशी आहे?

सदर योजने नुसार या निमित्ताने उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना

तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा प्रमाणपत्र व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तिश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पित करण्यात यावीत असे अहवान करण्यात आले आहे.

सदर उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधित उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल.

बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा. असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे श्री ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले आहे. राज्यात भरती प्रक्रिया घोटाळ्यामुळे गाजत असतानाच क्रीडा विभागाने बोगस क्रीडा प्रमाणपत्र विषयी चालू केलेली कार्यवाहीमधून अनेक बोगस प्रमाणपत्र धारक समोर येण्याची दाट शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना ( Scholarship scheme for students studying abroad )

Scholarship scheme for students studying abroad

विद्यार्थ्यांना आपले पदवीव्युतर शिक्षण परदेशात करण्याची खूप इच्छा असते, मात्र आर्थिक कारणास्तव त्यांना परदेशात शिक्षणासाठी जाता येत नाही. यासाठी शासनाची अशा गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी खास योजना आहे. 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्याथ्यांना आर्थिक परिस्थीतीमुळे उन शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही . या विद्याथ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाय मिळावा म्हणून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये ज्या विद्याथ्यांना पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळाला आहे . अशा ७५ विद्यार्थ्यांना ( पी.एच.डी. – २८ व पदव्युत्तर पदवी -४७ ) परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते . ही योजना सन २००३-०४ पासून सुरु करण्यात आलेली आहे . 

प्रमुख अटी : 
  • विद्यार्थी अनु . जाती / नवबौध्द टकातील असावा . 
  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असशवा . 
  • विद्यार्थ्यांचे वय पदव्युत्तर पदवी करिता ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे व पीएचडी करिता वय ४० पेक्षा जास्त नसावे . विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु . ६.०० लाखापेक्षा जास्त नसावे . 
  • विद्यार्थ्याने परदेशातील latest QStop 300 world ranking विद्यापीठांत प्रवेश घेतलेला असावा . Qs top 100 world ranking मध्ये असणाऱ्या परदेशी विद्यापीठांमध्ये तसेच लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेणान्या विद्याथ्यांसाठी उत्पन्न मर्यादा लागू राहणार नाही .
  • अन्यासक्रम अर्धवट सोडल्यास विद्यार्थ्यावर शासना मार्फत करण्यात आलेली संपूर्ण रकम संबंधित विद्यार्थ्यांचे पालक द जर्मनदार यांच्याकडून वसूल केली जाईल , चे बंधपत्र विद्यार्थ्यांचे पालक व जामीनदार यांनी निवढीनंतर देणे बंधनकारक राहील. 
  • अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत पीएच.डी अभ्यासक्रमाचा कमाल ०४ वर्षे किंवा यापेक्षा कमी असलेला प्रत्यक्ष कालावधी तसेच पदव्युत्तर पदवीकरिता कमाल ०२ यर्ष किंवा यापेक्षा कमी असलेला प्रत्यक्ष कालावधी ग्राहय धरावा. 
लाभाचे स्वरूप :
विद्यापीठाने प्रमाणित केलेली शिक्षण फीची पूर्ण राम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो . विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासांठी यु.एस. डॉलर १४००० तर यु.के.साठी पौंड ९ ००० इतका अदा करण्यात येते . विद्यार्थ्याला आकस्मिक खर्च साठी यू.एस.ए. व इतर देशांसाठी यु.एस.डी. १५०० व यु.के.साठी पौड ११०० इतके देण्यात येतात . पुस्तके , अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा यात समावेश आहे . विद्यार्थ्यास परदेशात जाताना ( with shortest route and economy class only ) , व अभ्यासक्रम संपल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च तिकीट सादर केल्यानतंर मंजूर करण्यात येतो .
इतर खास योजना :- 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती 
प्रमुख अटी : 
विद्यार्थी हा अनु , जाली व नवबौध्द प्रवर्गातील असावा , विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु .२.५० लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे , विद्यार्थी शालांत परिक्षोत्तर व त्या पुढील शिक्षण घेत असलेला असावा , विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा . 
लाभाचे स्वरूप : 
विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान , दरमहा रु २३० ते ५५० या दराने निर्वाह भत्ता , वसतिगृहात राहुन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु . ३८० ते १२०० निर्वाह भत्ता .