पंजाब आणि सिंध बँक मध्ये “विशेषज्ञ अधिकारी” पदांच्या विविध रिक्त जागासाठी तात्काळ भरती.

पंजाब आणि सिंध बँक मध्ये “विशेषज्ञ अधिकारी" पदांच्या विविध रिक्त जागासाठी तात्काळ भरती.पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV)” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.

पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा – 20- 40 वर्षे

अर्ज शुल्क –
SC/ST/PWD – 100 + लागू कर + पेमेंट गेटवे शुल्क.
सामान्य, EWS आणि OBC – 850 + लागू कर + पेमेंट गेटवे शुल्क.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटpunjabandsindbank.co.in

ऑनलाईन अर्ज करा
https://ibpsonline.ibps.in/

रेल्वे भरती मंडळाने पॅरामेडिकलच्या 1376 विविध पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा.

रेल्वे भरती मंडळाने पॅरामेडिकलच्या 1376 विविध पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा.RRB अंतर्गत “आहारतज्ज्ञ, नर्सिंग अधीक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर Gr III, लॅब सुपरिंटेंडंट Gr III, परफ्यूजनिस्ट, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ग्रॅथॅक्ट्रीयन, ग्रॅक्ट्रीशियन, इ. रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II, फील्ड वर्कर” पदांच्या एकूण 1376 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

पदाचे नाव –आहारतज्ज्ञ, नर्सिंग अधीक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर Gr III, लॅब सुपरिंटेंडंट Gr III, परफ्यूजनिस्ट, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ग्रॅथॅक्ट्रीयन, ग्रॅक्ट्रीशियन, इ. रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II, फील्ड वर्कर

पदसंख्या – १३७६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18-43 वर्षे

अर्ज शुल्क –
For all candidates – Rs. 500/-
SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female – Rs. 250/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी

अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/

ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/cmuF8

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) तारीख जाहीर! Maharashtra Teacher Eligibility Test 2024

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) तारीख जाहीर! Maharashtra Teacher Eligibility Test 2024महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक – १०/११/ २०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.

इ. १ली ते ५ वी व इ. ६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक – ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक – ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

रजिस्ट्रेशन लिंक खाली दिली आहे 👇

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) तारीख जाहीर! Maharashtra Teacher Eligibility Test 2024

रजिस्ट्रेशन लिंक : क्लिक करा 

सोलापूर नोकरी : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आस्थापनेवरील पदासाठी थेट भरती, शैक्षणिक पात्रता 12 वी व पदवीधरांना संधी.

सोलापूर नोकरी : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आस्थापनेवरील पदासाठी थेट भरती, शैक्षणिक पात्रता 12 वी व पदवीधरांना संधी.मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पदे ( प्रशिक्षणार्थी ) भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेणेकरीता पात्रता व निकष निश्चित करण्यात आले असून, उमेदवारांनी विहित कालावधी दिलेल्या ठिकाणी हजर राहायचे आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी.

पात्रता व निकष.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय / पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी असावी. मात्र शिक्षण चालु असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय १८ ते ३५ वयोगटामध्ये असणे आवश्यक आहे.

इतर महत्वाचे :

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवारांची आधार नोंदणी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
  • विद्यावेतन :
  • १२ वी : ( रु. ६,०००/-),
  • डिप्लोमा / आयटीआय : ( रु.८,०००/- )
  • पदवी : (रु.१०,०००/-) विद्यावेतन शासनाकडून देण्यात येईल. उमेदवाराकडे MS-CIT, मराठी आणि इंग्रजी ३० व ४० प्र.श.मि. इ. बाबतचे प्रमाणपत्र असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रशिक्षणार्थीची नियुक्ती कोणत्याही विशिष्ट पदावर करावयाची नसून ती “प्रशिक्षणार्थी’ म्हणून असेल..

How to Apply –

इच्छुक व पात्र उमेदवारांनी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, कागदपत्रे व स्वतःचे शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल येथे दि. ०९/०९/२०२४ रोजी १०.०० वा. हजर रहावे.

CISF Bharti : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती

CISF Bharti : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात रिक्त 1130 जागांसाठी भरती [CISF Bharti] जाहीर करण्यात आली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अधिक सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात पहावी.

पदाचे नाव :- कॉन्स्टेबल/फायर [पुरुष :-1130 पदे]

शैक्षणिक पात्रता :- 12वी(विज्ञान) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :- उंची: 170 सेमी, छाती: 80-85 सेमी

वयाची अट :- 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही].

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM)

Apply Link :- https://cisfrectt.cisf.gov.in/

अधिकृत वेबसाईट :- https://www.cisf.gov.in/

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 15 हजार रिक्त पदांची भरती जाहीर, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा.

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 15 हजार रिक्त पदांची भरती जाहीर, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा.महिला व बालविकास विभाग अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांमधील १५ हजार मदतनिसांची पदे भरली जाणार आहेत. सदर पद भरती जिल्हा निह्याय होणार असून, पात्र व इच्छुक उमेदवार महिलांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात एक लाखांवर अंगणवाड्या सुरू आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता मिनी अंगणवाड्या मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी मदतनीस व सेविकांची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्याने पदभरती होणार आहे.

दरम्यान २ फेब्रुवारी २०२३च्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत ७५ गुण शैक्षणिक पात्रतेवर तर २५ गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात. मात्र, मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत पाच गुण मिळत नसल्याचे समोर आले आहे.

अंगणवाड्यांमधील भरतीची स्थिती

मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्या १३,०११
मदतनीस पदभरती १५,०००
सेविकांची रिक्त पदे ६,०००
भरतीचे एकूण गुण १००

मदतनीस महिला कर्मचाऱ्यास मोठ्या झालेल्या अंगणवाड्यांवर सेविका म्हणून प्राधान्याने नेमणूक मिळणार.

तत्पूर्वी, भरतीसाठी बारावी उत्तीर्णची अट घातल्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने सेविकांची भरती तुर्तास स्थगित आहे. त्यामुळे पूर्वीच्या ज्या मदतनीस महिला कर्मचारी बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना ‘मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्यांवर सेविका म्हणून प्राधान्याने नेमणूक दिली जात आहे. तर त्या अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदे नव्याने भरली जात आहेत. त्यात शैक्षणिक पात्रतेवर ७५ गुण असून उर्वरित २५ गुण विधवा, अनाथ, एससी- एसटी, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, दोन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव या बाबींवर आहेत. यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग नसल्याने मराठा आरक्षणानंतरही त्या उमेदवारांना भरतीत त्याचा लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

अंगणवाड्यांमधील पदभरती प्रक्रिया –

  • अर्जदारांमधून सेविका किंवा मदतनीस म्हणून उमेदवारांची भरती तथा निवड करताना १०० गुणांचा निकष लावण्यात आला आहे.
  • इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारास गुणांच्या टक्केवारीनुसार ४५ ते ६० गुण दिले जातात. याशिवाय पदवीधर असल्यास एक ते पाच गुण (टक्केवारीनुसार), पदव्युत्तरसाठी चार गुण, डीएडसाठी दोन, बीएडसाठी दोन व ‘एमएस-सीआयटी’साठी दोन गुण अतिरिक्त दिले जातात.
  • याशिवाय विधवा, अनाथ उमेदवारासाठी १० गुण, एससी-एसटी प्रवर्गासाठी दहा गुण, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व विशेष मागास प्रवर्गासाठी पाच गुण आणि दोन वर्षांचा अनुभव असलेल्यांना पाच गुण, अशी गुणदानाची पद्धत आहे. या ‘एसईबीसी’ प्रवर्ग अजून समाविष्ट झालेला नाही.