ITBP अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी तात्काळ भरती, ऑनलाईन करा.

ITBP ने “हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटर्नरी), कॉन्स्टेबल (पशु परिचर), कॉन्स्टेबल (कॅनलमन), कॉन्स्टेबल (नाई), कॉन्स्टेबल (स्वीपर) / (सफाई कर्मचारी), कॉन्स्टेबल (माळी), कॉन्स्टेबल (टेलर), कॉन्स्टेबल (मोची), सहाय्यक उप -निरीक्षक (फार्मासिस्ट), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स), हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ)” पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळेल. इंडो-तिबेट पोलीस दलाने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ITBP मध्ये 351 पदांवर भरती होणार आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइट itbpolice.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. Online application करण्याची तारीख हि 28 जुलै 2024, 18 ऑगस्ट 2024, 26 ऑगस्ट 2024 आणि 10 सप्टेंबर 2024 आहे.

ITBP रिक्त जागा तपशील:

  1. हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर पशुवैद्यकीय) – ०९ पदे
  2. कॉन्स्टेबल (ॲनिमल अटेंडंट) – 115 पदे
  3. कॉन्स्टेबल (कॅनेलमन) – ०४ पदे
  4. कॉन्स्टेबल (न्हावी) – ०५ पदे (०४ पुरुष आणि ०१ महिला)
  5. कॉन्स्टेबल (स्वीपर) / (सफाई कर्मचारी): 101 पदे (86 news पुरुष आणि 15 महिला)
  6. कॉन्स्टेबल (माळी) – ३७ पदे (३२ पुरुष आणि ०५ महिला)
  7. कॉन्स्टेबल (शिंपी) – १८ पदे
  8. कॉन्स्टेबल (मोची) – ३३ पदे
  9. सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) – १० पदे
  10. उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) – ०५ पदे
  11. हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ) – १४ पदे

नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत.

पे-स्केल : पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल 4 रु. 25,500 – 81,100)

अर्ज मोड: ऑनलाइन अर्ज

वय निकष: २० ते २५ वर्षे दरम्यान

अर्ज फी तपशील

अर्ज फी : रु. 100/-

अधिकृत वेबसाईट :  क्लिक करा

जाहिरात पहा : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक : Click Here 

महाराष्ट्रात होमगार्डमध्ये ९,७०० पदांसाठी भरती;१० वी पास उमेदवार पात्र.

महाराष्ट्रात होमगार्डमध्ये ९,७०० पदांसाठी भरती;१० वी पास उमेदवार पात्र.महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत ३४ जिल्ह्यातील एकूण ९७०० होमगार्ड पदासाठी भरती केली जाणार असून या संदर्भातले एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार दहावी पास उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. सध्या राज्यात होमगार्ड जवान या पदासाठी ९७०० जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लवकरच होमगार्ड भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत १६ ऑगस्ट २०२४ पासून या भरतीची सुरुवात होणार आहे. होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

  • पात्रता :
    २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
  • शारिरीक विकलांग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही.
  • या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यात नोकरी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही.
  • याबाबत अर्ज प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भारतीय मानक ब्युरो उपभोक्ता प्रकरणे, खाद्य व सार्वजनिक विभाग अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती जाहिराती प्रसिद्ध.

भारतीय मानक ब्युरो उपभोक्ता प्रकरणे, खाद्य व सार्वजनिक विभाग अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती जाहिराती प्रसिद्ध.

भारतीय मानक ब्युरो उपभोक्ता प्रकरणे, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय (उपभोक्ता प्रकरणे विभाग) विविध रिक्त पदाची भरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी आपल्या अर्ज www.bis.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. सविस्तर जाहिरात आणि पदासाठी अर्जाकरिता कृपया बीआयएसची वेबसाइट www.bis.gov.in पहा. उमेदवारांना बीआयएस वेबसाइटच्या माध्यमातून २०.०७.२०२४ ते ०९.०८.२०२४ (शेवटची तारीख) पर्यंत ऑनलाइन अर्ज करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत अर्ज जमा करण्याचे अन्य कोणतेही माध्यम/ मोड स्वीकारण्यात येणार नाही.

पदाचे नाव व पदसंख्या

मॅनेजमेंट एक्झिक्युटीव (एमई) एन.आय.टी.एस. – 03 पदे
पात्रता : इंजिनिरिंग स्नातकसह एमबीएसहित (मार्केटींग)

मॅनेजमेंट एक्झिक्युटीव (एमई) टी. एन.एम.डी./ एस.सी.एम.डी. -02 पदे
पात्रता : इंजिनिरिंग स्नातकसह एमबीएसहित (वित्त/मार्केटींग/मानव संसाधन/सामान्य)

मॅनेजमेंट एक्झिक्युटीव (एमई) आय. आर. अँड टी.आय.एस.डी.- 03 पदे

पात्रता : इंजिनिरिंगमध्ये स्नातकसह एमबीए (अधिमानतः आंतरराष्ट्रीय संबंध / आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये)

अनुभव
केंद्र सरकार / राज्य सरकार/ संघ राज्य सरकार/ सांविधिक / स्वायत्त निकाय/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ प्रतिष्ठित सरकारी एजंसी / देशव्यापी परिचालित खाजगी क्षेत्रातील संघटनांसह संबंधित क्षेत्रामध्ये एमबीए नंतर ०५ वर्षाचा अनुभव.

उच्च वयोमर्यादा : ४५ वर्षे

दरमहा वेतन : 11.5 लाख (निश्चित)

अर्ज सुरु तारीख : २०.०७.२०२४

अर्ज शेवट तारीख : ०९.०८.२०२४

अर्ज माध्यम/ मोड : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट : www.bis.gov.in पहा.

भारतीय मानक ब्युरो उपभोक्ता प्रकरणे, खाद्य व सार्वजनिक विभाग अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती जाहिराती प्रसिद्ध.

 

सर्च आरोग्य सेवा व संशोधन संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती 2024

सर्च आरोग्य सेवा व संशोधन संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती 2024

सर्च आरोग्य सेवा व संशोधन संस्था, गडचिरोली
सेक्रेटरी, फार्मसीस्ट, ऑफिस असिस्टेंट इ रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी :https://searchforhealth.ngo/get-involved/ला भेट द्या.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

1) सेक्रेटरी
पात्रता : पोस्टग्रॅजुएट डिग्री। किमान १० वर्षांचा ऑफिस कामाचा अनुभव, मराठी व इंग्लिशमध्ये पत्रव्यवहार क्षमता आणि चांगले IT कौशल्य
वेतन : Rs. ३५,०००/-

2) फार्मसीस्ट
पात्रता : बी. फार्म/डी. फार्म । फार्मसीमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव
वेतन : Rs. २०,०००/-

3) ऑफिस असिस्टेंट
पात्रता: डिग्री। किमान ३ वर्षांचा अनुभव. इंग्लिशमध्ये क्षमता आणि चांगले IT’ कौशल्य.
वेतन : Rs. २५,०००/-

अर्ज, CV पाठवा पत्ता : hr@searchforhealth.ngo SEARCH, At: Shodhgram, Post: Chatgaon, Taluka Dhanora, Dist: Gadchiroli, Maharashtra, Pin: 442606.

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा
जाहिरात पहा : Click Here 

Rayat Shikshan Sanstha Bharti : रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी जागांवर भरती; लगेचच अर्ज करा.

Rayat Shikshan Sanstha Bharti : रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी जागांवर भरती; लगेचच अर्ज करा.

Rayat Shikshan Sanstha Bharti : The recruitment advertisement for various vacancies has been published in Ryat Shikshan Sanstha, and this recruitment has been conducted for a total of 147 vacancies. For this, applications are invited from the interested qualified candidates through online mode. These applications are to be filled from 18th July 2024 to 25th July 2024 at 5:00 PM.

रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, एकूण 147 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित केली. यासाठी इच्छुक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज 18 जुलै 2024 पासून 25 जुलै 2024 संध्याकाळी 5 : 00 वाजेपर्यंत भरायचे असणार आहेत.

पदांचा तपशील
सहाय्यक प्राध्यापक – 147 जागा

  • पनवेल : 48 जागा
  • फुंडे : 19 जागा
  • वाशी : 33 जागा
  • राजापूर : 23 जागा
  • मोखाडा : 24 जागा

शैक्षणिक पात्रता व पगार

निवड झालेल्या उमेदवाराला यूजीसी तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पगार देण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अर्ज भरायचे आहेत हे अर्ज 18 जुलै 2024 पासून 25 जुलै 2024 संध्याकाळी 5 : 00 वाजेपर्यंत भरायचे असणार आहेत.

निवड प्रक्रिया (Rayat Shikshan Sanstha Bharti)

प्राप्त क्सालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे, ही मुलाखत 27 जुलै 2024 रोजी सकाळी ९.00 वाजता घेतल्या जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी, मुंबई व महात्मा फुले आर्ट सायन्स व कॉमर्स विद्यालय पनवेल या ठिकाणी ही मुलाखत घेतली जाणार आहे.

महत्त्वाच्या सूचना (Rayat Shikshan Sanstha Bharti)

  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून सोबत ठेवावी सर्व आवश्यक असलेले गुणपत्रके तसेच प्रमाणपत्रे स्वसाक्षांकित करून मूळ कागदपत्र सुद्धा उमेदवाराने सोबत ठेवणे आवश्यक असेल.
  • उमेदवार हा मागास प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील.
  • उमेदवार जर अपंग असल्यास उमेदवाराने अपंगत्वाचे प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती मधून येत असेल तर त्या अर्जदारास नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट जोडणे गरजेचे राहील.
  • उमेदवाराने कशा पद्धतीने अर्ज करायचा कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची याविषयीचे सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे उमेदवाराने व्यवस्थित रित्या जाहिरात डाऊनलोड करावी, वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

अंगणवाडी मध्ये 14 हजार पदांची मेगाभरती , अर्ज करण्याची शेवट तारीख 31 ऑगस्ट!

अंगणवाडी मध्ये 14 हजार पदांची मेगाभरती , अर्ज करण्याची शेवट तारीख 31 ऑगस्ट!

राज्यातील अंगणवाडी मध्ये लवकरच १४ हजार ६९० रिक्त पदासाठी भरती होणार आहे. या अंतर्गत मदतनीसची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यावेळी अधिक माहिती देतांना मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. याबाबत अधिकृत याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख 31 ऑगस्ट!

शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत, त्या नुसार अंमलबजावणी करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून इच्छुक महिलांना आपले अर्ज मदणीस पदासाठी सादर करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.