भारतीय स्टेट बँकतील असोसिएट भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, आठ हजार २८३ जागांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबरपर्यंत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट तथा लिपिक
पदसंख्या : ८,२८३ पदे
- अनुसूचित जातीसाठी एक हजार २८४,
- अनुसूचित जमातीसाठी ७४८,
- इतर मागास प्रवर्गासाठी एक हजार ९१९,
- आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्लूएस) ८१७ तर
- खुल्या प्रवर्गासाठी ३५१५ उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. एकात्मिक दुहेरी पदवी (IDD) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 31 डिसेंबर 2023 किंवा त्यापूर्वीची आहे याची खात्री करावी.
वयोमर्यादा 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावी.
परीक्षा स्वरूप : भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून, ती बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या परीक्षेसाठी इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठी माध्यमही उपलब्ध करून देण्यात आले.
अर्ज सुरु तारीख: नोव्हेंबर 17, 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : ७ डिसेंबर २०२३
पूर्व परीक्षा (१०० गुण) : जानेवारी २०२४
मुख्य परीक्षा (२०० गुण) : फेब्रुवारी २०२४
अर्ज फी : सर्वसाधारण/ OBC/ EWS श्रेणीसाठी अर्जाची फी ₹ 750/- आहे. SC/ST/PwBD/ESM/DESM यांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाइट : sbi.co.in
असा करा अर्ज
- सर्व प्रथम sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- मुख्यपृष्ठावर जा आणि SBI Clerk Recruitment 2023
- Apply Online link वर क्लिक करा.
- येथे तुमची नोंदणी करा, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे येईल.
- यानंतर अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जाची फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
- भविष्यातील संदर्भांसाठी डेस्कटॉपवर अर्जाची प्रत सेव्ह करा.