Maharashtra HSC Result 2023 : इयत्ता बारावी ( HSC ) ची निकालाची तारीख

 Maharashtra HSC Result 2023
HSC Exam 2023

Maharashtra HSC Result 2023:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) वतीने इयत्ता 12वीची वार्षिक परीक्षा घेण्यात आली. या सदर वर्षी महाराष्ट्र 12वी इयत्ता 2023 ची परीक्षा राज्यभरातून सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी दिली. आता सर्व विद्यार्थी व पालक यांना HSC Result निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.Maharashtra HSC Result 2023

महाराष्ट्र राज्य 12 वी ( HSC ) निकाल 2023 

www.maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर मे महिन्यात लागण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थी निकाल प्रकाशित झाल्यावर त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून 12वीचा निकाल पाहू शकणार आहेत.

Maharashtra 12th Class Result Date
Exam conducting body Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)
Exam Name Maharashtra Higher Secondary School Certificate Examination
MSBSHSE Exam date 2023 5th March 2023 to 20th of March 2023
Number of students around Around 14 lakh
Essential credentials Roll number, Mother’s name official
Official website maharesult.nic.in

महाराष्ट्र बारावीचा ( HSC ) निकाल 2023 SMS सुविधेद्वारे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने विद्यार्थ्यांना त्यांचा महाराष्ट्र HSC निकाल 2023 अधिकृत वेबसाइटवरून आणि सोबतच SMS सुविधेद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. SMS सुविधेद्वारे निकाल पाहण्यासाठी एक अधिकृत नंबर प्रसिद्ध केला जाणार असून, त्या नंबर ला विद्यार्थ्यांना SMS मार्फत आपला निकाल पाहता येणार आहे.

 महाराष्ट्र 12 वी ( HSC ) चा निकाल 2023 असा तपासा

पायऱ्या

  1.  www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2.  मुख्यपृष्ठावर, ‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२३’ लिंकवर क्लिक करा.
  3.  दिलेल्या फील्डमध्ये विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि आईचे नाव यासारखी क्रेडेन्शियल्स इनपुट करा.
  4.  ‘पहा निकाल’ वर क्लिक करा आणि ते सबमिट केले जाईल.
  5.  महाराष्ट्र 12वीचा निकाल 2023 आता विषयाच्या प्रवाहासह स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
  6.  निकाल डाउनलोड करा आणि तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र HSC निकाल 2023 चा प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घ्या
  7.  विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज verification.mh-hsc.ac.in वर ऑनलाइन सबमिट करावे लागतील.
  8.  उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी जास्तीत जास्त सहा विषयांसाठी अर्ज करता येईल.
  9.  विद्यार्थ्यांना रु. महाराष्ट्र एचएससी निकाल 2023 साठी अर्ज करण्यासाठी प्रति विषय ऑनलाइन 300 रु.

महाराष्ट्र HSC निकाल 2023-FAQ

1. महाराष्ट्राचा बारावीचा निकाल 2023 कधी जाहीर होईल?

उत्तर – महाराष्ट्र बोर्डाकडून महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 मे 2023 मध्ये जाहीर केला जाईल.

2. महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2023 तपासण्यासाठी अधिकृत लिंक कोणती आहे?

उत्तर – अधिकृत लिंक maharesult.nic.in आहे

लिंक क्रॅश झाल्यास विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल कसे कळतील?

उत्तर – जर जास्त रहदारीमुळे लिंक क्रॅश झाली असेल, तर तुम्ही SMS पर्याय वापरू शकता आणि MHHSCROLL NO असा मजकूर संदेश पाठवू शकता. 57766

 

इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरात मोठ्या चुका, प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘उत्तरे’!

इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरात मोठ्या चुका, प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘उत्तरे'!

राज्यात आज पासून इयत्ता बारावीच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे. पहिल्याच पेपर मध्ये चुका आढळून आल्या आहेत. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी प्रमाणे पेपरात चुका ही असणे ही परंपरा बोर्डाने कायम ठेवली आहे, अशीच सध्या सर्वत्र चर्चा आहे.

या संदर्भात अधिक तपशील जाणून घेतला असता इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिकेच्या प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले. काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचानासह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत.

चुकीच्या प्रश्नाचे गुण देण्याची मागणी.

कृतिपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.