चेन्नई सुपर किंगची दमदार कामगिरी!
IPL 2021:In this phase of IPL 2021, Chennai Super Kings have beaten Mumbai Indians by 20 runs at Dubai. After winning the toss, Chennai batted first and scored 156 for 6 in 20 overs. With four wickets in hand in the first five overs, Chennai have proved once again that they are the Kings of Comeback by winning the match by 20 runs.
आयपीएल 2021च्या या टप्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर 20 धावांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या होत्या. पहिल्या पाच षटकांमध्ये 24 वर 4 गडी बाद असताना थेट 20 धावांनी सामना जिंकत चेन्नईने आपणच कमबॅकचे किंग्स असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने नाबाद 58 चेंडूत 88 धावा, रवींद्र जडेजाने 26 तर ब्राव्होने 23 धावा करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. महेंद्रसिंग धोनी 3 तर सुरेश रैना 4 धावांवर बाद झाले. सध्या गुणतालिकेमध्ये 8 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवत या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत 12 गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.
मुंबईकडून क्विंटन डी कॉकला (17) दीपक चहरने पायचित केले व अनमोलप्रीतची दांडी गुल करत 16 धावांवर त्याला तंबूचा मार्ग दाखवला. सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड व कृणाल पंड्या धावा जमवण्यात अपयशी ठरले. सौरभ तिवारीने 5 चौकारांसह नाबाद 50 धावा केल्या. चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होने 25 धावांत 3 बळी घेत मुंबईच्या डावाला सुरूंग लावला. दीपक चहरने 2 बळी घेत ब्राव्होला उत्तम साथ दिली.
संघातील खेळाडू
मुंबई इंडियन्स –अनमोलप्रीत सिंग, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड (कर्णधार), सौरभ तिवारी, कृणाल पंड्या, ॲडम मिल्न, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, मोईन अली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर आणि जोश हेझलवूड