शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०२१ सत्रासाठी प्रवेश सूचना ITI Admission Portal : https://admission.dvet.gov.in
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ( Craftsman Training Scheme ) ऑगस्ट २०२१ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया ( Centralized Online Admission Process ) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर “ माहितीपुस्तिका – प्रवेश पध्दती , नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती ” दि . १५ जुलै , २०२१ पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे . राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र . संस्थांमध्ये दि . १५ जुलै , २०२१ पासुन रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत नि : शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे . सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा . प्रवेश पध्दती , नियमावली , प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय औ.प्र . संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा . सदर मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी
माहिती डाउनलोड, मूळ जाहिरात, प्रवेश आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करा
माहिती पुस्तिका डाउनलोड 👉 – Download
मूळ जाहिरात 👉 – Download
प्रवेश आवश्यक कागदपत्रे 👉 – Download
ऑनलाईन अर्ज करा, अधिकृत वेबसाईट भेट द्या.
ऑनलाईन अर्ज करा – http://admission.dvet.gov.in
अधिकृत वेबसाईट – http://admission.dvet.gov.in
टीप : अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर नाही. वरील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती घ्या.