NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2022 तारीख जाहीर.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2022

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.

दिनांक १० ऑक्टोबर २०२२ पासून NMMS साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे.
https://www.mscepune.in/व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज शाळांना उपलब्ध होतील.

सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची
उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

शिष्यवृत्ती रक्कम

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप कारण्यात येते.

पात्रता :-

  1. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता
    ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या
    परीक्षेस बसता येते.
  2. पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत
    असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन
    २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा
    उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
  3. विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत
    जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला
    असावा.)
  4. खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत.
    विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
    • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
    • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
    • शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
    • सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.