Maharashtra SSC Result 2022 : दहावी ( SSC ) बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दि. 17 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करीत कारण्यात आली आहे. (Maharashtra SSC 10th Board Exam Result 2022)
असा पहा निकाल –
- दहावीचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवर ‘एसएससी निकाल-2022’ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर ‘Now’वर क्लिक केल्यानंतर जन्मतारखेसोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
- पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 पाहू शकाल.
- प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
- निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून घ्या.
दरम्यान या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. हा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता http://www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.