परीक्षेला सामोरे जाताना | प्रत्येक विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी हे वाचलेच पाहिजे..!

परीक्षेला सामोरे जाताना | प्रत्येक विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी हे वाचलेच पाहिजे..!

 

मुलांच्या अडनिड्या वयात शारीरिक बदलांबरोबरच मानसिक भावनिक बदलही मूल अनुभव लागते . परीक्षेच्या ताणाचीही त्यात भर पडते . तेव्हा मुलांना भीती घालणे , अभ्यासाचा तगादा मागे लावणे पालकांनी टाळलेले बरे . फेब्रुवारी – मार्च महिने जवळ आले की घरोघर परीक्षांचे वारे वाहू लागतात . जशी जशी परीक्षा जवळ येत जाते तसतसा विद्यार्थी दिवसरात्र एक करून खोलीत स्वत : ला कोंडून घेतो . इतकेच नव्हे तर संपूर्ण कुटूंबच समाजापासून स्वत : ला तोडून अचानक अलिप्त वागते . 

परीक्षांच्या या काळात सगळ्यात महत्त्वाचे ठरते ते अभ्यासाचे तंत्र समजून घेणे 

अभ्यास करायचा म्हणजे धडा वाचून प्रश्नोत्तरे सोडवायची इतपतच मर्यादित आहे का ? उत्तम वाचन , स्मरण , मनन , चिंतन आणि सराव या सगळ्या गोष्टींचा सार फलित म्हणजे अभ्यास हे ज्यांना आत्मसात होते , त्यांना उत्तम गुण मिळतात . परीक्षांसाठीच खरी तयारी संकल्पाने सुरु होते , परिस्थिती कितीही कठीण असली तरी ही परीक्षा , ध्येय मी पूर्ण शक्तीनिशी पार करीन असा संकल्पच विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा . हा संकल्पच आपल्याला मानसिक ऊर्जा पुरवतो , ध्येय गाठायाची शक्ती म्हणजे संकल्प . ही मनाची एक धारणा आहे . ही एकदा मनाने धारण केली की आपले सगळे लक्ष एकाच ध्येयाकडे एकवटते . एकाग्रता साधता येते . असा मनाचा निग्रह जर आपण साधू शकलो . तर लहानमोठ्या अडचणींवर आपण संकल्पाच्या ऊर्जेचे मात करू शकतो

वर्षभर नियमीत शाळेत , कॉलेजला , क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पूरक साहित्याचा साठा नक्कीचच असतो . तो बारकाईने • अभ्यासला गेला पाहिजे . नोटस् , गाईड , टेस्ट सिरीजमधील पेपर , मागील वर्षाच पेपर असे खूप साहित्य जमवून ठेवण्यात विद्यार्थी तरबेज असतात . पूरक साहित्याचे अध्ययन नीट झाले की त्या विषयात हातोटी मिळवता येते .

  • कुठल्याही विषयाची उजळणी करण्याची प्रत्येकाची आपली एक पध्दत असते.  ती व्यक्तीनुरुप बदलू शकते . साधारण  एखादा विषय अध्ययनासाठी घेतलाअसता ,
  •  त्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे वाचणे ,
  • त्यात आपल्याला काय महत्त्वाचे वाटते ते स्वत : च्या भाषेत मुद्देसूद लिहून काढणे ,
  • त्या धड्यात कुठल्या महत्त्वाच्या आकृत्या , तक्ते , नकाशे , फॉम्युले दिले आहेत त्यावर लक्ष पूरविणे ,
  • काही वेळानंतर वाचलेले आपल्याल किती लक्षात राहिले ? याचा आढावा घणे ,
  • अध्ययनाची पुनरावृत्ती करताना आपल्याला कोणते मुद्दे आठवले नाहीत यावर लक्ष पुरवून त्याची उजळणी करणे ,
  • आपण कुठे चुकतोय , याबाबत आढावा घेणे , आपली गणितं चुकताहेत ? की फॉर्म्युले आठवत नाहीयेत ? की सराव कमी पडतोय , हे तपासून स्वत : तले को दुवे ओळखून स्वत : च्या अभ्यास उजळणीत सुधारणा करुन आणणे , हे सगळे महत्त्वाचे ठरते .
  • भाषा विषयाची उजळणी जर आपण करणार असू तर-त्या विषयात पाठ्येतर अवांतर वाचनास , मुद्दे स्वत : च्या शैलीत मांडण्यास खूप महत्त्व असते .
  • निबंधाचा सराव करायचा ठरविला तर निबंधाची सुरुवात , शेवट उल्लेखनिय , आकर्षक होईल याकडे आपण बघितले पाहिजे .

परीक्षा तयारी व वेळ नियोजन 

परीक्षेदरम्यान वेळेचे भान राखणे खूप महत्त्वाचे ठरते . प्रश्नांची उत्तरे जरी येत असली तरी मुद्देसूद , नेमक्या शब्दांत विशिष्ट वेळेतच ती लिहिली जायला हवीत . यासाठी सरावतंत्र उपयोगात आणता येते .

जितका तुमचा सराव जास्त , तितकी तुमची उत्तरे सुसूत्र ! आकृत्या , तक्ते , व्याख्या दिलेली उदाहरणे , हाताखालून जाणे , त्याचे लेखन सवयीचे होणे फार गरजेचे आहे .

व्याख्या लिहिताना फाफटपसारा न लिहिता पुस्तकात दिलेली नेमकी व्याख्या तशीच्या तशी लिहिल्यास पूर्ण गुण मिळतात . या नेमक्या लिखाणाची हातांना सवय हवी.

गणिताच्या सरावासाठी सातत्य राखणे फार महत्त्वाचे ठरते . स्टेप्स न चुकवता उत्तर अचूक येणे , पूर्ण गुण देणारे असते.त्यामुळे कठीण गणिताचा सराव कामी येतो .

शाळा , क्लास , टेस्ट सिरीज , होमवर्क , परीक्षा , जाण्यायेण्याचा वेळ अशा विद्यार्थीच्या व्यग्र दिनक्रमात फार कमी वेळ मूळ अभ्यासाकरीता , उजळणीकरीता , स्व – अध्ययनासाठी शिल्लक राहतो .

प्रत्येक विद्यार्थ्यांची बुध्दिमत्ता , ज्ञान ग्रहण करण्याची आकलनशक्ती , ज्ञान स्मरणात साठविण्याची कौशल्ये , ते ज्ञान पुन्हा वापरु शकण्याचे तंत्र वेगळे असते . त्यानुरुप त्यांची अभ्यास कौशल्येही बदलतात . सुरुवातीपासूनच स्व – अध्ययनाची गोडी विद्यार्थ्यांना लागली असेतल तर अभ्यासाचे आणि वेळेचे गणितही जुळून येते . थोड्या वेळात जास्त अभ्यास होतो .

उत्तरपत्रिकेतील गिचमिड अक्षर , खाडाखोड मनातील संभ्रम दर्शवितात,  तेव्हा ते टाळणेच योग्य.

पालकांची भूमिका 

मुलांच्या शालेय विकासात पालक सुयोग्य हातभार लावू शकतात . मुलांच्या या अडनिड्या वयात शारिरीक बदलांबरोबरच मानसिक , भावनिक बदलही मूल अनुभवू लागते . परीक्षेच्या ताणाचीही त्यात भर पडते . तेव्हा मुलांना विश्वासात घेऊन , संवाद साधून , अभ्यासाचे महत्त्व जर पटवून दिले असेल तर परीक्षांच्या वेळी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणे , त्यांना धीर देणे , त्यांची मानसिक ओढाताण कमी करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे या सर्व भूमिका पालक उत्तमरित्या निभावू शकतील .

संपूर्ण तयारीनिशी परीक्षांना सामोरे गेल्यास यशाचे उत्तुंग शिखर गाठणे नक्कीच शक्य आहे . इयत्ता १० वीची लेखी परीक्षा मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात तर १२ वी ची फेब्रुवारीमध्ये सुरु होते . तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेपूर्वी १५ दिवस अगोदर असतात .

तयारीला लागा, अभ्यासाला भरपूर वेळ द्या, नियोजन करून केलेला अभ्यास नक्की यश मिळवून देतो.

धन्यवाद !

इयत्ता 7 वी. भाषा ( मराठी ) | ऑडिओ स्वरूपात कविता

इयत्ता 7 वी. भाषा ( मराठी ) | ऑडिओ स्वरूपात कविता


इयत्ता 7 वी ( मराठी माध्यम ), विषय :भाषा ( मराठी )

अभ्यासाची विविध माध्यमे आहेत, यामध्ये श्रव्य ( ऐकणे ) हे प्रभावी माध्यम अध्ययन व आध्यापनाचे असून यामुळे अभ्यास आणखीन सोपा होण्यासाठी मदत होते. म्हणून तुमच्यासाठी आम्ही काही कविता ऑडिओ स्वरूपात खाली लिंक स्वरूपात दिल्या आहेत. ऑडिओ स्वरूपात सर्व कविता डाउनलोड करा व ऐका. 

डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

      इयत्ता 7 वी.  मराठी – कविता

अ.क्र कविता नाव           Download 

———————————–

1 जय जय महाराष्ट्र माझा       Download 

————————————

2 श्रावणमास                   Download 

—————————————-

3 अनामवीरा                    Download 

———————————————

4 गोमू माहेरला जाते            Download 

——————————————-

5 असे जगावे                    Download 

————————————-

6 माझी मराठी                    Download 

————————————–

7 थेंब आज हा पाण्याचा  Download 

——————————————

🌐 Visit website : https://www.myableeducation.com

GREAT THOUGHTS | प्रेरणादायी विचार | सुविचार

Character, not brain, will count at the                                            crucial moment

                                   – Rabindranath Tagore 

Some men are bom great, some achieve greatness, and some have greatness thrust upon them. 

                                  – William  Shakespeare 

Education is the chief defence af a nation

                                           – Burke

 He who fears you presence, will hate you absence. 

                                          – English Proverb 

 People generaly quarrei because they cannot argue. 

                                        –  G. K. Chesterton

 Generally the theories we believe, we call them facts, and the facts we disbelieve we cail them theories. 

                                        – Felix Cohen

To err is human; to forgive, divine.

                                    – Alexander Pope 

There is not a sadder sight than a pessimist. 

                                            – Mark Twain

The powers of mind are like the rays of the sun dissipated. When they are concentrated, they illumine. 

                            –  Swami Vivekanand 

The aim of argument, or of discussion, should not be victory, but progress. 

                                      – Joseph Joubert 

At times it is better to keep your mouth shut and let people wonder if you’re a fool than to open it and remove all their doubts. 

                                – James Sinclair 

A man may die, nations may rise and fall, but an idea lives on. Jdeas have endurance without death.

                                – John F. Kennedy 

Yesterday is a canceled cheque; tomorrow is a promissory note; today is the only cash you have – so spend it wisely. 

                                        – Kay Lyons 

Always forgive your enemies – Nothing annoys them so much. 

                                        – Oscar Wilde 

The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.

                           – Rabindranath Tagore 

To get profit without risk, experience without danger, and reward without hard work, is as impossible as it is to live without being born. 

                             – A. P. Gouthey 

If you would not Nke to be forgotten as soon as you are dead, either write things worth reading or do things worth writing. 

                              – Benjamin Franklin 

Termper is a funny thing; you can’t get rid of it by losing it.

                               – Somerest Maugham

 The secret of success in life is for a man to be ready for his opportunity when it comes.

                                       –  Benjamin Disraeli 

“you wonder how to do a job, get started, and wonder how you did it! 

                                          – Goethe 

When you aim for perfection, you discover it’s a moving target

                                         –  George Fisher