शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात महत्वाचे अपडेट, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा !

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात महत्वाचे अपडेट, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा !

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. माघील अनेक दिवसापासून राज्य सरकार राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्याबाबत विचार करत होत. मात्र अशातच आता राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत. अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

दरम्यान शिक्षकांच्या बदल्या विषयी पुढे बोलताना त्यांनी, या बदल्या न करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो. ही बाब विचारात घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांतील शिक्षकांच्या नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत. मात्र जर एखाद्या शिक्षकाला बदली करायचीच झाल्यास त्यासाठी विशेब बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिक्षकांच्या नियमित बदल्या आदेश लवकरच काढण्यात येणार

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात लवकरच आदेश काढण्यात येणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभाग, शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. शालेय जीवनात मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यात शिक्षकांची भूमिका देखील महत्त्वाची असते. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे शिक्षक त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे मोलाचे काम करत असतात. मात्र दर तीन वर्षांनी शिक्षकाची बदली झाली तर यामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे यापुढे नियमित बदल्या न करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला असल्याचे सांगितले.

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १५ : शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला स्थानिक आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, “आज शाळेचा पहिलाच दिवस आणि आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह शाळेच्या नवीन वास्तूत शिक्षण घेता येणार आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद होत आहे. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत.

त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतील. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत”, असे त्यांनी नमूद केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरात ज्या-ज्या ठिकाणी शाळांची गरज असेल त्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले. दहिसर परिसरात सातवीपर्यंत असलेल्या शाळा लवकरच आठवी ते दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, असे श्री. केसरकर यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

माहिती सौजन्य : महासंवाद

शेतकऱ्यांना खुशखबर ! ‘या’ तारखेला होणार मान्सूनच आगमन, पंजाब डख यांचे मान्सूनच वेळापत्रक पहा.

पंजाब डख मान्सून वेळापत्रक जाहीर 2023

Panjab Dakh Monsoon : शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यात मान्सूनच लवकरच आगमन होणार असल्याचे हवामान तज्ञ् पंजाब डख यांनी सांगितले आहे. दिवस शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबराव ढोकी यांनी या मान्सूनचे वेळापत्रक जाहीर केले.

हवामान तज्ञ् पंजाब डख याच्या हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये मान्सून आगमनासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे मान्सूनचे वेळेतच आगमन होणार असून यंदा मान्सून हा जोरदार राहणार आहे. मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्रात कोसळणार आहे. पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 19 मे ते 21 मे पर्यंत ढगाळ हवामान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्यात मान्सूनच आगमन केव्हा होणार?

तसेच 22 मे ते 24 मे दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. या कालावधीमध्ये मात्र भाग बदलत पाऊस पडणार आहे. याशिवाय, राज्यात 31 मे, एक जून, दोन जून आणि तीन जून रोजी पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाची शक्यता राहणार आहे.

पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून 21 ते 22 मे दरम्यान अंदमान मध्ये पोहोचणार आहे. म्हणजेच वेळेतच मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये होत आहे. विशेष म्हणजे यावर्षी महाराष्ट्रात देखील वेळेतच मान्सून पोहचणार आहे.

शेतकरी बांधवांची खरीप पूर्व तयारी

दरवर्षी महाराष्ट्रात मान्सून आगमन सात जूनच्या आसपास होते यंदा देखील मानसून आगमन आठ जूनला होण्याची शक्यता आहे. निश्चितच या अंदाजामुळे आता राज्यातील शेतकरी बांधव खरीप पूर्व तयारीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करणार आहेत.

SSC HSC Result Date 2023: बारावीचा निकाल ‘या’ दिवशी, तर दहावीचा निकाल १० जूनपूर्वी लागणार.

SSC HSC Result Date 2023: बारावीचा निकाल ‘या’ दिवशी, तर दहावीचा निकाल १० जूनपूर्वी लागणार.

SSC HSC Result Date 2023 : दहावी-बारावीच्या निकालाची जयत तयारी सुरु असून पहिल्या टप्प्यात बारावीचा निकाल ३ ते ४ जून रोजी जाहीर होईल. तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर करण्यात येईल. त्यादृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु असल्याची माहिती अंतर्गत सूत्राकडून मिळाली आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरु झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक ९० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात असल्याने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.मेअखेरीस निकाल जाहीर न झाल्यास ३ ते ४ जूनपर्यंत तो निकाल लागेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सहा ते आठ दिवसांत म्हणजेच १० जूनपर्यंत दहावीचा निकाल लावला जाणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता / DA फरक अदा करण्यासाठी अनुदान वितरण करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR पहा

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता / DA फरक अदा करण्यासाठी अनुदान वितरण करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR पहा

तुम्ही जर राज्य कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची खुशखबर आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2023 ते जून 2023 चे वेतन , अतिरिक्त कार्यभार , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.04.05.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर जीआर नुसार राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे एप्रिल 2023 ते जुन 2023 चे वेतन व वेतनावरील बाबीकरीता अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत सहपत्र शासनास विनंती करण्यात आलेली होती . त्यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित केलेल्या निधीपैकी बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या निधी मधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे एप्रिल ते जून 2023 चे वेतन व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

शासन निर्णय डाउनलोड कराक्लिक करा 

यानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2023 ते माहे जून 2023 चे वेतन व वेतनावरील बाबींकरीता एकुण 9,20,900/- इतके अनुदान या उद्दिष्टाखाली मुंबई यांच्याकडे वित्त विभागाच्या अटी व शर्तीनुसार माहे माच्र 2023 चे वेतन , महागाई भत्ता फरक मार्च 2023 व वेतनावरील बाबींकरीता 10 टक्के नुसार वितरीत निधी बिम्स प्रणालीनुसार उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे .

सदर तरतुद सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई यांच्याकडे सुपुर्द करण्यास देत असून याकरीता अवर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी तर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील असा आदेश सदर निर्णयान्वये देण्यात आलेला आहे .

या संदर्भातील अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.04 मे 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

 शासन निर्णय डाउनलोड करा क्लिक करा 

शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर…! येथे पहा निकाल.

शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर...! येथे पहा निकाल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल शाळा लॉगिन करून पाहू शकता.

शिष्यवृत्ती परीक्षाचा अंतिम निकाल येथे क्लिक करा