यंदा शाळांचा निकाल १ मे ऐवजी ‘या’ तारखेला होणार जाहीर, शिक्षण संचालकाचे परिपत्रक जारी.

यंदा शाळांचा निकाल १ मे ऐवजी 'या' तारखेला होणार जाहीर, शिक्षण संचालकाचे परिपत्रक जारी.

राज्यात जर वर्षी १ मे रोजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांत ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करून शैक्षणिक वर्षाचा निकाल व गुणपत्रक वाटप केले जाते. मात्र यंदा १ मे ला प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळाचा निकाल लागणार नाही. त्याऐवजी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी/ पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे.

तसेच, निकालासोबत उपक्रम / कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा असे परिपत्रक शिक्षण संचालकाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.

शिक्षण संचालक परिपत्रक
राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत संदर्भिय क्र. १ वरील शासन निर्णयानुसार तपशिलवार सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या संदर्भिय क्र. २ वरील पत्रान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. उक्त सूचनांमध्ये सुट्टीचा कालावधी, शाळांचे निकाल जाहीर करणे, सन २०२३ २४ चे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादीबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ६ मे, २०२३ रोजी आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे.

9. दिनांक १ मे, २०२३ रोजी ‘महाराष्ट्र दिन’ सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात यावा.

२. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी/ पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे. तसेच, निकालासोबत उपक्रम / कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात यावा.

३. संदर्भिय क्र. १ वरील शासन निर्णय आणि संचालनालयाच्या संदर्भिय क्र. २ वरील पत्रामध्ये दिलेल्या सूचनांनुसार शाळांच्या उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ सुरू करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही…

यंदा शाळांचा निकाल १ मे ऐवजी 'या' तारखेला होणार जाहीर, शिक्षण संचालकाचे परिपत्रक जारी.

सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, सेवा निवृत्तीच्या वयोमर्यादेत (Retirement Age) वाढ होणार!

सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, सेवा निवृत्तीच्या वयोमर्यादेत (Retirement Age) वाढ होणार!

Retirement Age | सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण भारतातील निवृत्तीची वयोमर्यादा (Retirement Age) वाढण्याची जास्त शक्यता . भारत सरकारच्या ईपीएफओला (EPFO) या संस्थेने वयोमर्यादा वाढवण्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे निवृत्तीच्या वयोमर्यादेचा (Age Limit) संबंध या परिस्थितीशी जोडण्याची गरज आहे, असे ईपीएफओचे मत आहे.

आघाडीच्या दै. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ च्या वृत्तानुसार, येत्या काळात देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येत होणारी वाढ आणि जगण्यासाठी परिस्थिती अधिक अनुकूल होत आहे.
येत्या काही काळात लोकसंख्येचा मोठा हिस्सा निवृत्तीच्या वयोमर्यादेत येईल. परिणामी पेन्शन फंडावरील (Pension Fund) भार लक्षणीयरित्या वाढेल, असे ईपीएफओला वाटते. त्यामुळे भारत सरकार लवकरच वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान एका रिपोर्ट नुसार देशातील 14 कोटी नागरीक होणार रिटायर होणार आहेत. ईपीएफओने व्हिजन डॉक्युमेंट 2047 तयार केले आहे. 2047 सालापर्यंत भारतात अंदाजे 14 कोटी नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असतील, असा अंदाज आहे. यामुळे पेन्शन फंडावरील दबाव लक्षणीय रित्या वाढेल.

SSC, HSC Results 2023 : दहावी आणि बारावीची परीक्षा निकाल तारखा जाहीर, जाणून घ्या कधी लागणार निकाल.

SSC, HSC Results 2023 : दहावी आणि बारावीची परीक्षा निकाल तारखा जाहीर, जाणून घ्या कधी लागणार निकाल.

SSC-HSC Results : दहावी (SSC Exam 2022) आणि बारावीची परीक्षा (HSC Exam 2022) दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच (SSC, HSC Results) जाहीर होणार आहे. येत्या 10 जूनपर्यंत बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल (HSC Result) जाहीर करणार येणार आहे. तर 20 जूनपर्यंत दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सोमवारी हीदेण्यात आली.

दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे देखील लक्ष निकालाकडे लागले आहे. अशामध्ये आता निकालाच्या तारखा जाहीर करण्यात आल्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण होत आहे. सध्या दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान दरवर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होत असतो.

शिक्षकांनी पेपर तपासणीवर ( आंदोलन)बहिष्कार टाकल्यामुळे निकाल उशिरा लागेल असे म्हटले जात होते. पण आता निकाल वेळेतच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजने संदर्भात मोठे अपडेट, सरकारने स्पष्ट केली भविष्यातील योजना…

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजने संदर्भात मोठे अपडेट, सरकारने स्पष्ट केली भविष्यातील योजना... Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अंत्यत महत्वाची बातमी आहे. काही राज्यांनी ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करण्याच्या घोषणेवर सोमवारी लोकसभेत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. जुनी पेन्शन योजना’ लागू करण्याच्या असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सोमवारी लेखी उत्तर दिले. त्यांच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्र्यांनी ‘जुनी पेन्शन योजना’ ( Old Pension Scheme ) लागू करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

त्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा बाजूला होण्याची शक्यता आहे.

जुनी पेन्शन (ओपीएस) लागू करण्यासाठी अनेक राज्यांनी त्यांच्या स्तरावर अधिसूचना जारी केल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारला हे स्पष्ट करायचे आहे की एनपीएसचे पैसे परत करण्याची कोणतीही तरतूद नाही असे अर्थ राज्यमंत्र्यांच्या भागवत कराड म्हणाले.

दरम्यान छत्तीसगड, झारखंड, राजस्थान आणि पंजाब सरकारने राज्य कर्मचार्‍यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली असताना अर्थ राज्यमंत्र्यांचे हे उत्तर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कडून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती नवीन अपडेट्स

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेले वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती संदर्भात नवीन अपडेट्स आली आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती करताना काही प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी.

आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत देखील http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.

 

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना २०२२-२३ साठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना २०२२-२३ साठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येते. केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत.

कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना साठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक

  • दिनांक 08 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे
  • तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.
  • तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 15 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 22 ऑक्टोबर ही असेल.

वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक

  • दिनांक 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे
  • तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.
  • तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 15 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 31 ऑक्टोबर ही असेल.

वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक-

  • दिनांक 07 नोव्हेंबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे
  • तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.
  • तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 31 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 07 नोव्हेंबर, 2022 ही असेल असे समाजकल्याण विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आले आहे.