पूर्व उच्च प्राथमिक ( इ .5 वी ) व पूर्व माध्यमिक ( इ .8 वी ) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 प्रश्नपत्रिका संच

पूर्व उच्च प्राथमिक ( इ .5 वी ) व पूर्व माध्यमिक ( इ .8 वी ) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 प्रश्नपत्रिका संच

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्या वतीने जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ . 5 वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ . 8 वी च्या इयत्ताच्या प्रश्न पत्रिका सर्व माध्यमाच्या खाली देण्यात आल्या आहेत. 

पूर्व उच्च प्राथमिक ( इयत्ता ५ वी ) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ परीक्षा प्रश्नपत्रिका संच

पूर्व उच्च प्राथमिक ( इ .5 वी ) व पूर्व माध्यमिक ( इ .8 वी ) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 प्रश्नपत्रिका संच

क्लिक करा 

पूर्व माध्यमिक ( इयत्ता ८ वी ) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ परीक्षा प्रश्नपत्रिका संच

पूर्व उच्च प्राथमिक ( इ .5 वी ) व पूर्व माध्यमिक ( इ .8 वी ) शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 प्रश्नपत्रिका संच

क्लिक करा

Maharashtra SSC Result 2022 : ब्रेकिंग! दहावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार; महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत घोषणा!

Maharashtra SSC Result 2022 : ब्रेकिंग! दहावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार; महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत घोषणा!Maharashtra SSC Result 2022 : दहावी ( SSC ) बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दि. 17 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करीत कारण्यात आली आहे. (Maharashtra SSC 10th Board Exam Result 2022)

असा पहा निकाल –

  • दहावीचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर ‘एसएससी निकाल-2022’ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Now’वर क्लिक केल्यानंतर जन्मतारखेसोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
  • पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 पाहू शकाल.
  • प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
  • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून घ्या.

दरम्यान या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. हा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता http://www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

दहावीच्या निकालाबाबत महत्वाचे अपडेट्स, ‘या’ तारखेपर्यंत निकाल लागणार?

दहावीच्या निकालाबाबत महत्वाचे अपडेट्स, ‘या’ तारखेपर्यंत निकाल लागणार?शैक्षणिक अपडेट : बारावीचा निकाल नुकताच लागला असून आता विद्यार्थी व पालकांचे लक्ष दहावीच्या ( SSC ) बोर्ड निकालाकडे लागून राहिले आहे. मात्र आता ही उत्सुकता जास्त ताणली जाणार नाही, कारण 15 जून पर्यंत दहावीचा निकाल लागेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत सूत्रकडून मिळते आहे. त्यामुळे दहावी निकालाची प्रतीक्षा काही दिवसात संपणार आहे.

थोडक्यात महत्वाचे
दहावी परीक्षा कालावधी – 15 मार्च रोजी सुरु झाल्या व 4 एप्रिल रोजी संपल्या.
नोंदणी विद्यार्थी – एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी – पैकी 8 लाख 89 हजार 584 मुले , तर 7 लाख 49 हजार 487 मुलीनी परीक्षा दिली आहे.
बारावी बोर्डाच्या परीक्षा कालावधी – 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या.
प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 14 लाख 85 हजार 826

सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी! सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हफ्ता रोखीने मिळणार..!

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेला शासन निर्णय GR डाउनलोड करा

सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी! सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हफ्ता रोखीने मिळणार..!शासन निर्णय : राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हफ्ता रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. माघील काही महिन्यापासून सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा कधी मिळणार याबाबत वारंवार शासनाकडे विचारना केली जात होती. आता पगारी सोबतच तिसरा हप्ता अदा केला जाणार आहे.

सदर शासन निर्णया नुसार, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी.

(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी. (ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. (क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२२ च्या वेतनासोबत अदा करण्यात येईल.

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेला शासन निर्णय GR डाउनलोड करा.

शासन निर्णय GR डाउनलोड करा : क्लिक करा

दहावी बारावी परीक्षेला सामोरे जाताना ! अभ्यासाचे व्यवस्थापन कसे कराल?.

दहावी बारावी परीक्षेला सामोरे जाताना ! अभ्यासाचे व्यवस्थापन कसे कराल?.नमस्कार,

दहावी बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, अभ्यासाचा ताण कसा टाळावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आरोग्य कसे सभाळावे, विषयानुरूप वेळेचे नियोजन करावे, अभ्यासाच्या साहित्यचा योग्य वापर, लेखन पद्धती, दहावी बारावी परीक्षेला सामोरे जाताना ! व्यवस्थापन अभ्यासाचे कसे कराल?  यासारख्या महत्वपूर्ण विषयाची मांडणी करण्यासाठी सदर लेखप्रपंच करण्यात आला आहे. परीक्षाला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी व पालक यांनी नक्कीच हा लेख आवर्जून वाचलाच पाहिजे.

फेब्रुवारी – मार्च महिने जवळ आले की घरोघर परीक्षांचे वारे वाहू लागतात . जशी जशी परीक्षा जवळ येत जाते तसतसा विद्यार्थी दिवसरात्र एक करून खोलीत स्वत : ला कोंडून घेतो . इतकेच नव्हे तर संपूर्ण कुटूंबच समाजापासून स्वत : ला तोडून अचानक अलिप्त वागते .

मुलांच्या अडनिड्या वयात शारीरिक बदलांबरोबरच मानसिक भावनिक बदलही मूल अनुभव लागते . परीक्षेच्या ताणाचीही त्यात भर पडते . तेव्हा मुलांना भीती घालणे , अभ्यासाचा तगादा मागे लावणे पालकांनी टाळलेले बरे .

परीक्षांच्या या काळात सगळ्यात महत्त्वाचे ठरते ते अभ्यासाचे तंत्र समजून घेणे , अभ्यास करायचा म्हणजे धडा वाचून प्रश्नोत्तरे सोडवायची इतपतच मर्यादित आहे का ? उत्तम वाचन , स्मरण , मनन , चिंतन आणि सराव या सगळ्या गोष्टींचा सार फलित म्हणजे अभ्यास हे ज्यांना आत्मसात होते , त्यांना उत्तम गुण मिळतात .

परीक्षासाठी मनाची तयारी….!

परीक्षांसाठीच खरी तयारी संकल्पाने सुरु होते , परिस्थिती कितीही कठीण असली तरी ही परीक्षा , ध्येय मी पूर्ण शक्तीनिशी Tenth and twelfth exams ऊर्जेचे मात करु शकतो . वर्षभर नियमीत शाळेत , कॉलेजला , क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पूरक साहित्याचा साठा नक्कीचच असतो . तो बारकाईने अभ्यासला गेला पाहिजे .

अभ्यास साहित्य विषयी थोडक्यात…

नोटस् , गाईड , टेस्ट सिरीजमधील पेपर , मागील वर्षाचे पेपर असे खूप साहित्य जमवून ठेवण्यात विद्यार्थी तरबेज असतात . पूरक साहित्याचे अध्ययन नीट झाले की त्या विषयात हातोटी मिळवता येते . कुठल्याही विषयाची उजळणी करण्याची प्रत्येकाची आपली एक पध्दत असते . ती व्यक्तीनुरूप बदलू शकते . साधारण : एखादा विषय अध्ययनासाठी घेतला असता ,

  • त्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे वाचणे ,
  • त्यात आपल्याला काय महत्त्वाचे वाटते ते स्वतःच्या भाषेत मुद्देसूद लिहून काढणे ,
  • त्या धड्यात कुठल्या महत्वाच्या आकृत्या , तक्ते , नकाशे , फॉम्युले दिले आहेत त्यावर लक्ष पुरविणे ,
  • काही वेळानंतर वाचलेले आपल्याल किती लक्षात राहिले ? याचा आढावा घणे , अध्ययनाची पुनरावृत्ती करताना आपल्याला कोणते मुद्दे आठवले नाहीत यावर लक्ष पुरवून त्याची उजळणी करणे ,
  • आपण कुठे चुकतोय , याबाबत आढावा घेणे , आपली गणितं चुकताहेत ? की फॉर्म्युले आठवत नाहीयेत ? की सराव कमी पडतोय , हे तपासून स्वतःतले कच्चे दुवे ओळखून स्वतःच्या अभ्यास उजळणीत सुधारणा करून आणणे , हे सगळे महत्त्वाचे ठरते .

परीक्षेच्या दृष्टीने लेखन सराव व लेखन पद्धती

भाषा विषयाची उजळणी जर आपण करणार असू तर त्या विषयात पाठ्येतर अवांतर वाचनास मुद्दे स्वतःच्या शैलीत मांडण्यास खूप महत्त्व असते .

  • निबंधाचा सराव करायचा ठरविला तर निबंधाची सुरुवात , शेवट उल्लेखनिय , आकर्षक होईल याकडे आपण बघितले पाहिजे .
  • परीक्षेदरम्यान वेळेचे भान राखणे खूप महत्त्वाचे ठरते . प्रश्नांची उत्तरे जरी येत असली तरी मुद्देसूद ,
  • नेमक्या शब्दांत विशिष्ट वेळेतच ती लिहिली जायला हवीत . यासाठी सरावतंत्र उपयोगात आणता येते .
  • जितका तुमचा सराव जास्त , तितकी तुमची उत्तरे सुसूत्र ! आकृत्या , तक्ते , व्याख्या दिलेली उदाहरणे , हाताखालून जाणे , त्याचे लेखन सवयीचे होणे फार गरजेचे आहे .
  • व्याख्या लिहिताना फाफटपसारा न लिहिता पुस्तकात दिलेली नेमकी व्याख्या तशीच्या तशी लिहिल्यास पूर्ण गुण मिळतात . या नेमक्या लिखाणाची हातांना सवय हवी .
  • गणिताच्या सरावासाठी सातत्य राखणे फार महत्त्वाचे ठरते . स्टेप्स न चुकवता उत्तर अचूक येणे , पूर्ण गुण देणारे असते . त्यामुळे कठीण गणिताचा सराव कामी येतो .
  • शाळा , क्लास , टेस्ट सिरीज , होमवर्क , परीक्षा , जाण्यायेण्याचा वेळ अशा विद्यार्थीच्या व्यग्र दिनक्रमात फार कमी वेळ मूळ अभ्यासाकरीता , उजळणीकरीता , स्व – अध्ययनासाठी शिल्लक राहतो .
  • प्रत्येक विद्यार्थ्यांची बुध्दिमत्ता , ज्ञान ग्रहण करण्याची आकलनशक्ती , ज्ञान स्मरणात साठविण्याची कौशल्ये , ते ज्ञान पुन्हा वापरु शकण्याचे तंत्र वेगळे असते .
  • त्यानुरूप त्यांची अभ्यास कौशल्येही बदलतात . सुरुवातीपासूनच स्व – अध्ययनाची गोडी विद्यार्थ्यांना लागली असेतल तर अभ्यासाचे आणि वेळेचे गणितही जुळून येते .
  • थोड्या वेळात जास्त अभ्यास होतो . उत्तरपत्रिकेतील गिचमिड अक्षर , खाडाखोड मनातील संभ्रम दर्शवितात . तेव्हा ते टाळणेच योग्य , मुलांच्या शालेय विकासात पालक सुयोग्य हातभार लावू शकतात .

विदयार्थ्यांची मानसिक ओढाताण कमी करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे

मुलांच्या या अडनिड्या वयात शारिरीक बदलांबरोबरच मानसिक , भावनिक बदलही मूल अनुभवू लागते . परीक्षेच्या ताणाचीही त्यात भर पडते . तेव्हा मुलांना विश्वासांत घेऊन , संवाद साधून , अभ्यासाचे महत्त्व जर पटवून दिले असेल तर परीक्षांच्या वेळी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणे , त्यांना धीर देणे , त्यांची मानसिक ओढाताण कमी करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे या सर्व भूमिका पालक उत्तमरित्या निभावू शकतील . संपूर्ण तयारीनिशी परीक्षांना सामोरे गेल्यास यशाचे उत्तुंग शिखर गाठणे नक्कीच शक्य आहे . इयत्ता १० वीची लेखी परीक्षा मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात तर १२ वी ची फेब्रुवारीमध्ये सुरु होते . तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेपूर्वी १५ दिवस अगोदर असतात .

Maha Board Exam 2022 -दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक उपलब्ध!

Maha Board Exam 2022 -दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक उपलब्ध!It has now been decided that the 10th-12th exams will be held offline. Therefore, students need to have more writing practice in the exams (10th 12th board exams 2022). The question paper has been prepared by the State Institute of Educational Research and Training (SCERT) and will be made available to the students free of cost on the SCERT website.
The purpose behind this is to give them an idea of ​​the questions to be asked in the exam, to get extra practice.
Subject wise question papers have been uploaded on the website http://www.maa.ac.in.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षांमध्ये (10th 12th board exams 2022) विद्यार्थ्यांचा लेखन सराव जास्त होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (SCERT) ही प्रश्नपेढी तयार करण्यात आली असून, ती विद्यार्थ्यांना ‘एससीईआरटी’च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
त्यांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा,जास्तीचा सराव व्हावा हा उद्देश या माघे आहे.
http://www.maa.ac.in या वेबसाइटवर विषयनिहाय प्रश्नपेढी अपलोड करण्यात आल्या आहेत.

प्रश्नपेढी 2021-2022

प्रश्नपेढी पाहण्यासाठी खालील इयत्तेला क्लिक करा.

इयत्ता १० वी प्रश्नपेढी

इयत्ता १२ वी प्रश्नपेढी