Common Entrance Test (CET)
महाराष्ट्र सरकारने दहावीची परीक्षा ( Ssc exam 2021 ) रद्द करण्याचा निर्णय घेतला असून सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची बाबत उत्सुकता लागून राहिली आहे. शालेय विभागा कडून जाहीर करण्यात आल्या प्रमाणे CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. ( FYJC Class 11th Admission Process Maharashtra )
त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले आवडीच्या, चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी CET ला चांगले मार्क मिळवणे आवश्यक आहे कारण ऍडमिशन हे मेरिट नुसार होणार आहेत त्यामुळे CET ला जास्त मार्क मिळवणे आवश्यक आहे. मात्र बहुतांशी विद्यार्थ्यांना या CET बाबत किंवा तयारी बाबत फार माहिती नाही. म्हणजे
CET तयारी करीत असताना प्रथम CET स्वरूप ( Exam Mode ) काय असणार आहे? अभ्यासक्रम ( Syllabus ) काय असणार आहे? प्रश्नसंख्या ( number of Questions ) किती असणार आहे? या सगळ्या विषयी माहिती मिळाली की विद्यार्थ्यांना CET ची तयारी करायला सोपे होणार आहे.
CET स्वरूप ( Exam Mode ) :
इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक ( Optional ) CET परीक्षा आयोजित केली जाणार असून ती ऑफलाईन घेतली जाणार आहे . म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सदर CET परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
अभ्यासक्रम ( Syllabus ) :
प्रवेश परीक्षा म्हणजे CET ही राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यामध्ये दहावीच्या गणित ( भाग 1 व भाग 2 ), विज्ञान ( भाग 1 व भाग 2 ), इंग्रजी, मराठी, समाजशात्र , कार्यानुभव, आय सी टी इत्यादी विषयावर आधारित प्रश्न विचाले जातील.
प्रश्नसंख्या व गुण ( number of Questions & Mark ) :
सदर CET साठी एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील व ही परीक्षा ही 100 गुणांची असेल, OMR पद्धतीने घेतली जाईल .
ORM म्हणजे काय?
कॉम्प्यूटर सायन्समधील ऑब्जेक्ट – रिलेशनल मॅपिंग (ओआरएम, ओ / आरएम, आणि ओ / आर मॅपिंग टूल) ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंग भाषा वापरुन विसंगत टाइप सिस्टममधील डेटा रूपांतरित करण्यासाठी एक प्रोग्रामिंग तंत्र आहे.
वेळ ( Time ) : 2 तास वेळ
CET प्रशनोत्तर सराव
- विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा देण्यासाठी अगोदर पासूनच अभ्यास केला आहे, मध्यंतरी काही काळ खंड पडला असेल, पण आता पुन्हा CET साठी अभ्यास करावा लागणार आहे. मात्र हा अभ्यास करीत असताना CET स्वरूप डोळ्या समोर ठेवून करावा लागेल.
- विषयानुसार ऑब्जेक्टिव्ह प्रश्न यांचा जास्तीत जास्त सराव करावा. यासाठी पाठ्यपुस्तकात दिलेल्या स्वाध्यातील प्रश्नावर भर द्यावा.
- पाठानुसार बहुपर्यायी प्रश्न यांचा जास्त सराव करावा.
- गणितासारख्या विषयात सराव महत्वाचा असून यात ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा लागेल. कमी वेळेत अचूक उत्तर ओळखणे आवश्यक असते म्हणून सराव महत्वाचा आहे .
- इतर विषयाबाबतीही ही पद्धत अवलंबून, शिक्षकांच्या मदतीने जास्तीत जास्त प्रश्नसंच तयार करून वेळ लावून प्रश्न पत्रिका सोडविणे.
CET न दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे होणार ?
CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता 10 वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केले जाणार आहे.