MPSC, UPSC, सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक यासारख्या स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत Carant Afair ( चालू घडामोडी ) संबंधित प्रश्न विचाले जातात. कोविड 19 संबंधित संपूर्ण घडामोडीसह –
मार्च Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात
- सीरम इन्स्टिट्यूट ( Serum Institute ) आणि Novavax यांच्या भागिदारीतून तयार होत असलेल्या कोरोना लसीच्या ( corona vaccine ) चाचणीला भारतात सुरुवात झाली आहे . ती ब्रिटन आणि आफ्रिकेतील कोरोना व्हेरिएन्टविरोधात 89 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे . सप्टेंबर 2021 पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध .
- २ जानेवारी महिन्यात Novavax या लसीची चाचणी ही आफ्रिकेतील 245 कोरोना रुग्णांवर करण्यात आली होती . हे सर्व रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह होते . त्यांना या लसीचा डोस देण्यात आल्यानंतर असं लक्षात आलं की ही लस 48.6 टक्के प्रभावी आहे .
- त्यानंतर या लसीची ट्रायल ही ब्रिटनमधील 18 ते 84 वयाच्या 15,000 कोरोना रुग्णांवर करण्यात आली . त्यामध्ये 27 टक्के रुग्ण हे 65 वर्षावरील होते . त्यावेळी आलेल्या परिणामातून असं लक्षात आलं की , कोरोनाच्या मूळच्या स्ट्रेन विरोधात ही लस 96.4 टक्के प्रभावी ठरली तर ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनविरोधात ती 86.3 टक्के प्रभावी ठरल्याचं दिसून आले .
- भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे . त्यामुळे भारताने आता देशांतर्गत कोरोना लसीचा तुटवडा जाणवू नये म्हणून आपल्या शेजारील राष्ट्रांना आणि आफ्रिकेतील , युरोपातील देशांना करण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या निर्यातीवर काही कालावधीसाठी बंदी आणली आहे.
पंतप्रधानांनी घेतला लशीचा पहिला डोस
- दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ( एम्स ) दिनांक 01 मार्च 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कोरोना लशीचा पहिला डोस टोचून घेऊन कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात केली . स्वदेशी ‘ भारत बायोटेक ‘ च्या ‘ कोव्हॅक्सिन ‘ चा डोस घेतला आणि भारताला कोरोनामुक्त करण्यासाठी देशवासियांनाही लस टोचून घेण्याचे आवाहन केले .
- पुदुच्चेरी , केरळच्या परिचारिका , आसामी गमछा ! मोदी यांना एम्समधील ज्या परिचारिकेने लस दिली त्यांचे नाव आहे सिस्टर पी . निवेदा . त्या मूळच्या पुदुच्चेरीच्या आहेत . निवेदा यांच्यासोबत असलेल्या परिचारिकेचे नाव रोसम्मा अनिल , त्या मूळच्या केरळच्या आहेत .
- या दोन्ही राज्यांत जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्याच राज्यांतील परिचारिकांनी मोदी यांना लस देणे या योगायोगाची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती . मोदी यांनी लसीकरणासाठी येताना गमछा सोबत आणला होता . तो गमछा म्हणजे आसामची ओळख आहे . आसाममध्येही निवडणूक जाहीर झाली असल्याने त्याचीही चर्चा होती .
जागतिक नेत्यांच्या यादी :
- कोविड -19 लस परिणामकारक आहे हा विश्वास जनतेमध्ये निर्माण व्हावा यासाठी जागतिक स्तरावरील नेत्यांनी लस टोचून घेतली . त्याच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लस टोचून घेतली .
- २ संयुक्त राष्ट्रे सरचिटणीस अॅण्टोनिओ गुटेरस यांनी जानेवारी महिन्यात लस टोचून घेतली ,
- ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ ( 94 ) आणि त्यांचे पती प्रिश्नस फिलिप ( 99 ) यांनीही जानेवारी महिन्यात लस टोचून घेतली .
- त्याचप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी डिसेंबर महिन्यात लस टोचून घेतली .
- पोप फ्रान्सिस आणि पोप बेनेडिक्ट यांनीही लस टोचून घेतली .
- सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनीही जानेवारी महिन्यात लस टोचून घेतली तर त्यांचे पुत्र आणि राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनीही डिसेंबर महिन्यात लस घेतली.
🔘 हेही वाचा : पोलीस भरती लेखी परीक्षा फ्री ऑनलाईन टेस्ट