विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाची मोठी घोषणा.!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाची मोठी घोषणा.!

राज्यातील सर्व इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाबाबत महत्वाची घोषणा शिक्षण विभागाकडून नुकतीच करण्यात आली आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला होता. शाळा बंद ठेवून ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षक मंडळी कडून कारण्यात आला. त्यावेळी शालेय विभागाने इयत्ता नुसार अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी कारण्यात आला होता.

शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 मध्येही पहिली ते बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम (पाठ्यक्रम) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झालाय. परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळा 15 जूनपासून ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता अभ्यासक्रमात सूट या वर्षी दिली जाणार नाही.

शालेय शिक्षण विभागाने नुकताच मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पहिली ते बारावीसाठी 100 टक्के अभ्यासक्रम लागू असणार आहे. शासनाने नुकतीच या निर्णयास मान्यता दिल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Comment