महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून करता येणार आपल्या उसाची नोंद, शासनाकडून “महा-ऊस नोंदणी” ॲपची निर्मिती. जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रोसेस.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून करता येणार आपल्या उसाची नोंद, शासनाकडून "महा-ऊस नोंदणी" ॲपची निर्मिती. जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रोसेस.

साखर आयुक्त कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी ऊस पिक नोंदणीसाठी ” महा – ऊस नोंदणी ” हे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहेत . यामार्फत ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यात जाऊन ऊस नोंद करणे शक्य नाही . असे शेतकरी या मोबाईल अॅप मार्फत स्वतःच्या ऊस क्षेत्राची नोंद करू शकतात . तसेच ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यात ऊस क्षेत्र नोंद केली आहे , त्यांच्या नोंदणीची माहिती या अॅप मध्ये दिसून येईल .

मोबाईल ॲप वापरण्याबाबत सूचना

पायरी क्र -1
■ सर्व प्रथम गूगल प्ले स्टोअर मधून ” महा – ऊस नोंदणी ( Maha – US Nondani ) ” हे अॅप डाउनलोड करून घ्यावे .

■ अॅप डाउनलोड केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्याकडील चालू हंगामातील ऊस क्षेत्राची माहिती नोंदविण्यासाठी येथे Click करा . ” ऊस क्षेत्राची माहिती भरा ” असे दिसून येईल . त्या ठिकाणी आपण बटन दाबावे .महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून करता येणार आपल्या उसाची नोंद, शासनाकडून "महा-ऊस नोंदणी" ॲपची निर्मिती. जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रोसेस.

पायरी क्र -2

■ त्यानंतर ” ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती ” हे पेज दिसून येईल . त्यामध्ये क्रमाने माहिती भरावी मोबाईल नंबर , आधार नंबर , पहिले नाव , मधले नाव , आडनाव भरावे . त्यांनतर “ पुढे ” हे बटन दाबावे . “

■ यानंतर ” ऊस क्षेत्र असलेल्या ठिकाणाची माहिती ” हे पेज दिसून येईल . या ठिकाणी आपण प्रथम जिल्हा निवडावा , नंतर तालुका निवडावा , यानंतर गाव निवडावे . शेवटी गट नंबर / सर्वे नंबर टाकावा . यानंतर ” पुढे ” हे बटन दाबावे .

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून करता येणार आपल्या उसाची नोंद, शासनाकडून "महा-ऊस नोंदणी" ॲपची निर्मिती. जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रोसेस.

पायरी क्र -3

■ यानंतर ” ऊस लागवडीची माहिती ” हे पेज दिसून येईल यामध्ये आपण लागवड प्रकार आपण निवडावा , ऊसाची जात निवडावी , लागवड दिनांक भरावा . नंतर ऊस क्षेत्र गुंठ्या मध्ये भरावे . यानंतर ” पुढे ” हे बटन दाबावे .
■ नंतर ” ऊस पिक उपलब्द माहिती कोणत्या कारखान्यास कळवू इच्छिता ” हे पेज दिसून येईल , यामध्ये आपण ज्या कारखान्यामध्ये ऊस नोंद करावयाची आहे असे तीन कारखाने निवडावे . ( कमीत कमी एक कारखाना निवडावा ) . यानंतर ” पुढे ” हे बटन दाबावे .

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून करता येणार आपल्या उसाची नोंद, शासनाकडून "महा-ऊस नोंदणी" ॲपची निर्मिती. जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रोसेस.

पायरी क्र -4

■ यानंतर आपणास धन्यवाद .. ! असा मेसेज दिसून येईल व आपण निवडलेले संबंधित साखर कारखाने आपणास संपर्क साधतील .
■ यानंतर आपणास साखर कारखान्यातील आपली ऊस नोंद पाहण्यासाठी ” असे दिसून येईल या ठिकाणी आपण साखर कारखान्यात नोंदविलेला मोबाईल नंबर भरावा नंतर “ पुढे ” या बटनावर क्लिक करावे .महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून करता येणार आपल्या उसाची नोंद, शासनाकडून "महा-ऊस नोंदणी" ॲपची निर्मिती. जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रोसेस.

पायरी क्र -5

■ यानंतर या ठिकाणी आपणास आपण अॅपमध्ये प्रविष्ट केलेली ऊस नोंद
◾️साखर कारखान्याने स्वीकारलेली ऊस नोंद
◾️ साखर कारखान्याने नाकारलेली ऊस नोंद दिसून येईल .

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून करता येणार आपल्या उसाची नोंद, शासनाकडून "महा-ऊस नोंदणी" ॲपची निर्मिती. जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रोसेस.

पायरी क्र -6

धन्यवाद … !

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोबाईल वरून करता येणार आपल्या उसाची नोंद, शासनाकडून "महा-ऊस नोंदणी" ॲपची निर्मिती. जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रोसेस.

Spread the love

Leave a Comment