सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी महत्वाची शैक्षणिक अपडेट आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थ्यांसाठी दशसूत्री राबविली होती. तसेच आता जिल्ह्यातील गुरुजींच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, यासाठी शिक्षकांसाठी दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी दशसूत्री राबविण्याबाबत सीईओ स्वामी यांनी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांना सूचना दिल्या आहेत. या शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांसाठीच्या दशसूत्रीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शिक्षकांसाठीच्या दशसूत्री
- वर्गात शिकवत असताना मोबाईल बंद ठेवणे,
- वेळेचे बंधन,
- वाचाल तर वाचाल,
- शाळा परिसरातील स्वच्छ,
- व्यक्ती पेहराव,
- बोलण्यात सभ्यता,
- शाळेच्या आवारात धूम्रपान मनाई,
- सामाजिक उत्तरदायित्व,
- शाळा संस्कारक्षम करणे,
- शाळा परिसर पर्यावरण वातावरण तयार करणे,
हेही वाचा-
अशा मुद्यांचा समावेश दशसूत्रीमध्ये करण्यात आला आहे. शाळेच्या अस्तित्वावरच शिक्षकांचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे शिक्षकांची गुणवत्ता वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी आता दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार