शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय !

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय !

राज्यातील तब्बल 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश सोमवारी (ता. 22) काढत आनंदाची बातमी दिली आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विधान भवनातील दालनात शिक्षकांच्या बदल्यांचे हे आदेश जारी करण्यात आले. ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात कुठलाही मानवी हस्तक्षेप नसल्याचा दावा मंत्री गिरीष महाजन यांच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान, एकूण अर्जापैकी 33 टक्के बदल्या करण्यात आल्या. शिक्षकांना अन्य जिल्हा परिषदेत नेमणूक देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. आंतरजिल्हा बदल्यासाठी शिक्षकांचे एकूण 11871 अर्ज आले होते.

सदर बदल्या ह्या स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे कारण्यात आल्या आल्या आहेत. शासनाच्या आकडेवारी नुसार 34 फेऱ्यांमध्ये तब्बल 3943 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक 478 बदल्या पालघर जिल्ह्यात, तर सर्वात कमी 11 बदल्या नागपूर जिल्ह्यात झाल्या. पुण्यात 55 बदल्या झाल्या आहेत.

आंतरजिल्हा बदलीसाठी लावण्यात आलेलले निकष….

  • आंतरजिल्हा बदलीसाठी एका जिल्ह्यात 10 वर्षे, त्यापैकी एका शाळेत किमान 5 वर्षे सलग सेवा झालेली असणं गरजेचं आहे.
  • पक्षाघात व अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता, याची 53 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश ‘विशेष संवर्ग भाग-1’मध्ये केला आहे.
  • पती-पत्नी एकत्रिकरणासाठी त्यांचा समावेश ‘विशेष संवर्ग भाग-2’मध्ये करण्यात आला आहे.
Spread the love

Leave a Comment