मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने आता ” ही ” नवीन वेबसाइट सुरू केली !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने आता " ही " नवीन वेबसाइट सुरू केली !

1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत App वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. सदर योजने अंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्ताळावर जाऊन आपले अर्ज भरावेत

पोर्टल लिंक – https://ladakibahin.maharashtra.gov.in/

या योजेनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी (बीपीएल) उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही.

Spread the love

Leave a Comment