HSC Exam 2021: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education today announced the schedule for filling up applications for the Higher Secondary Certificate Examination to be held in 2022, i.e. Class XII (XII). Applications for the exam will be accepted from November 12 and schools are urged to fill up online applications on the website www.mahahsscboard.in for 12th standard students, said Varsha Gaikwad, Minister of State for Education.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून 2022 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी म्हणजेच इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. सदर परीक्षेचे अर्ज 12 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार असून शाळांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तपशील पुढीलप्रमाणे –
सदर परीक्षा अर्ज http://mahahsscboard.in येथे घेतले जातील. नियमित विद्यार्थ्यांना 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आले असून, परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायचे आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज वेळापत्रक
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.