SSC HSC Exam 2023 : राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा संदर्भात नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे .
कोरोनामुळे माघील दोन वर्षे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पद्धतीमध्ये अनेक बदल करत विदयार्थ्यांना अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. त्या सर्व सवलती आता रद्द करत, दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार आहेत.
बारावीची परीक्षा 21 फेब्रवारीपासून, तर दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरु होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही बोर्डाने निश्चित केले आहे. राज्यातील दहावीचे 16.27 लाख, तर बारावीतील 14.43 लाख, असे सुमारे 31 लाख विद्यार्थी 6 हजार केंद्रांवर ही परीक्षा देतील. 1 फेब्रुवारीपासून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, कोरोना काळात विद्यार्थ्यांना अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदाच्या परीक्षेत या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाच्या परीक्षेत नेमके काेणते बदल असतील, हे जाणून घेऊ या..
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षामध्ये बोर्डाने केलेले बदल
दोन पेपरमध्ये एक दिवस सुटी देण्यात येऊ शकते, त्यामुळे बोर्डाच्या सध्याच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. परीक्षेची सुरवात वेळेवर होईल, मात्र काही पेपर मागे-पुढे होऊ शकतात.
तसेच यंदाची परीक्षा ही पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा आसनार आहे. कोविड काळात सदर अभ्यासक्रम 25 टक्के कमी केला होता. आता संपूर्ण 100 टक्के अभ्यासक्रमावर दहावी-बारावीची परीक्षा होणार.
याशिवाय विद्यार्थ्यांना 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव देण्यात आला होता. तोही रद्द होणार आहे. तसेच, 60-40 गुणांसाठी असलेली अधिकची 15 मिनिटांची सवलतही मिळणार नाही. मात्र, दिव्यांगांना असणाऱ्या सवलती कायम असतील.
कोविड काळातील परीक्षासाठीची ‘होम सेंटर’ रद्द
कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे माघील वर्षी गावोगावच्या शाळा- महाविद्यालयात दहावी-बारावीची परीक्षा झाली होती. मात्र, यंदा केंद्र शाळां वरतीच परीक्षा होणार आहेत. कोविड काळातील परीक्षासाठीची ‘होम सेंटर’ रद्द होणार आहेत.