India Post :ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ, ग्रामीण डाक सेवक भरती ( GDC ) | पदसंख्या 2428 ( Maharashtra circle last date extended )

पदेशाखा पोस्टमास्टर,  सहायक शाखा पोस्टमास्टर,  डाक सेवक 

पदसंख्या : 2428

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – 100 रुपये 

वयोमर्यादा : वय 14 वर्षे ते 40 वर्षे. 

वेतन  : 10, 000 ते 14, 000 रुपये. 

किमान शैक्षणिक पात्रता : 
किमान पात्रता म्हणून, उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. शिवाय त्याने इंग्लिश, गणित आणि स्थानिक भाषा म्हणून अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय दहावीला घेतला असावा. 
संगणक पात्रता
मान्यता प्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेच्या उमेदवाराकडून किमान 60 दिवसाचे प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. किंवा दहावीला संगणक विषय घेतलेला असावा. 
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 10 जून 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती:

उमेदवारानी आपला अर्ज ऑनलाईन करायचा असून अर्ज प्रामुख्याने तीन टप्यात करायचा आहे. 

पहिला टप्पा : रजिट्रेशन 

अधिकृत वेबसाईट वर जाऊन प्रथम उमेदवारानी बेसिक माहिती भरून आपले ऑनलाईन रजिट्रेशनचा टप्पा पूर्ण करायचा आहे.

 दुसरा टप्पा : अप्लिकेशन फॉर्म भरणे 
या टप्प्यात उमेदवारानी आपली शैक्षणिक माहिती भरून ती व्हेरिप्राय करायची आहे. 
तिसरा टप्पा : फी भरणे 

आपल्या अर्जानुसार उमेदवारानी फी बाबतची प्रोसेस करून घ्यायची आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये फी असून, ऑनलाईन फी भरता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करा : Online Application link 
Spread the love

Leave a Comment