कोणता पुरावा लागतो ?
आरोग्य ओळखपत्र, असंघटित कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि ७/१२ उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.
योजनेचा लाभ कुणाला ?
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेतील ग्रामीण व नागरी भागातील वंचित व व्यवसाय निकषांवर आधारित कुटुंबाना मिळतो. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंद झालेल्या कुटुंबातील सदस्यांना संगणकीकृत ई-कार्डचा वापर करून योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात उपचार घेता येतो,
देण्यात येत आहेत. या योजनेत किरकोळ उपचारांपासून शस्त्रक्रियेचा लाभ घेता यतो.
लाभार्थ्यांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात योजनेंतर्गत या सुविधा मिळतात .
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील १५ दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करीत आहे.
या योजनेत सर्व कुटुंबातील सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळतो. आयुष्यमान योजना ही कॅशलेस योजना आहे. उपचारांसाठी एक रुपया पण द्यावा लागणार नाही.