मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी असा करा अर्ज?
पायरी 1
गुगल प्लेस्टोअर वरून “नारी शक्ती दूत ” अँप डाउनलोड करा.
पायरी 2
ज्या महिलेचा फॉर्म भरायचा त्यांचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे.
पायरी 3
लाडकी बहीण योजना ऑप्शन निवडून फॉर्म भरायला सुरुवात करावी
या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने महिलेला सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहावे लागले. जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नानंतरचे संपूर्ण नाव लिहावे लागेल.
पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे देखील आवश्यक आहे. जन्माचे ठिकाण आणि पिनकोड लिहिले देखील आवश्यक आहे. मोबाईल नंबर आणि आधारकार्ड नंबर देखील आवश्यक आहे. या अर्जामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न विचारण्यात आलाय की, इतरही कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहे का? असेल तर हो तिथे लिहावे लागेल. अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दलही महिलांना माहिती द्यावी लागेल.
यासोबतच बॅकेची संपूर्ण माहिती आणि बॅकेचा क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे. ते व्यवस्थितपणे द्यावे लागेल. बॅक क्रमांक आधारकार्डला जोडला आहे का? हे देखील अर्जात विचारण्यात आले आहे. यासोबत भरलेला अर्ज आपल्याला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून तपासून घेऊ शकता.
अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे अपलोड करा
आधार कार्ड, अधिवास\जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बॅंक पासबुक आणि यासोबतच अर्जदाराचे फोटोही आवश्यक आहे.