राज्यातील अंगणवाडी मध्ये लवकरच १४ हजार ६९० रिक्त पदासाठी भरती होणार आहे. या अंतर्गत मदतनीसची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यावेळी अधिक माहिती देतांना मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. याबाबत अधिकृत याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख 31 ऑगस्ट!
- महापारेषणची 4565 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरु, लगेच ऑनलाईन अर्ज करा.
- पोस्ट ऑफिस मध्ये 44228 जागांसाठी मेगा भरती,पात्रता 10 वी पास, लगेच ऑनलाईन अर्ज करा.
शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत, त्या नुसार अंमलबजावणी करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून इच्छुक महिलांना आपले अर्ज मदणीस पदासाठी सादर करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.