राज्यात शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे. सदर बदल्यांची प्रक्रिया 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे संबंधित विभागकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात तांत्रिक बाबी या एप्रिल महिन्यात पूर्ण कारण्यात आल्या होत्या. शासनाकडून दिलेल्या निर्देशनुसार जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांनी 7 नोव्हेंबरपर्यंत आपली माहिती सादर केली आहे.
पुढील प्रोसेस म्हणून आता 24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग भाग एकमध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता लागणार आहे.
ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार 30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.
दरम्यान शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहणार आहे . तसेच विशेष संवर्ग भाग-दोनसाठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत आहे. या दरम्यान शिक्षकांना त्यांचे त्यात 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांची बदली होणार नाही. त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहणार आहे .
या शिक्षकांची बदली होणार नाही…
सदर ऑनलाईन बदली प्रोसेस मध्ये भाग घेऊन प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही. बदल्याची ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी बदल्यांचे आदेश प्रकाशित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.