मे महिन्यात शिक्षकांच्या होणार ऑनलाईन बदल्या , जाणून घ्या ‘ बदली ॲप ’ प्रणाली बद्दल! 

मे महिन्यात शिक्षकांच्या होणार ऑनलाईन बदल्या , जाणून घ्या ' बदली ॲप ’ प्रणाली बद्दल! 

शैक्षणिक अपडेट 2022 : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी एक मोबाईल ‘ॲप’ विकसित केले आहे. त्याचा मसुदा तयार झाला असून, येत्या दोन आठवड्यांत ‘ॲप’चे राहिलेले काम पूर्ण होणार आहे. मोबाईल, तसेच संगणकावरही हे ‘ॲप’ वापरता येईल. या ‘ॲप’च्या माध्यमातून येत्या मे महिन्यात ऑनलाइन पद्धतीने या बदल्या होणार आहेत. सदर ‘ॲप’ ची प्रणाली कसे काम करणार आहे, याबाबत जाणून घ्या.

बदली ॲप प्रणाली उपयोग….

  • मोबाईल, तसेच संगणकावरही हे ‘ॲप’ वापरता येईल.
  • मोबाइल ॲपवरून बदली प्रक्रिया होणार असल्याने हजारो शिक्षकांचा डोकेदुखी संपणार आहे.
  • बदलीसाठी या ॲपवरच सोप्या पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी, या ॲपवरच पाहता येणार आहे.
  • या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
  • पहिल्या संवर्गाच्या बदल्या झाल्यानंतर पुढील संवर्गाच्या बदल्या टप्प्याटप्प्याने केल्या जाणार आहेत.
  • या बदलीची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शक असणार आहे.
  • प्रत्येक शिक्षकाला आपल्या मोबाइलवरच बदली प्रक्रियेची माहिती मिळणार असल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
  • त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक होण्यासाठी या ॲपचा उपयोग होणार आहे.
Spread the love

Leave a Comment