शिष्यवृत्ती परीक्षा 2023 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ची तारीख जाहीर कारण्यात आली आहे. प्रसिद्ध अधिसूचने नुसार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व
https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार असून १५ डिसेंबर पर्यंत नियमित शुल्कसह अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर विलंब व अतिविलंब शुल्क आकरले जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |