Rayat Shikshan Sanstha Bharti : रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी जागांवर भरती; लगेचच अर्ज करा.

Rayat Shikshan Sanstha Bharti : रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी जागांवर भरती; लगेचच अर्ज करा.

Rayat Shikshan Sanstha Bharti : The recruitment advertisement for various vacancies has been published in Ryat Shikshan Sanstha, and this recruitment has been conducted for a total of 147 vacancies. For this, applications are invited from the interested qualified candidates through online mode. These applications are to be filled from 18th July 2024 to 25th July 2024 at 5:00 PM.

रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, एकूण 147 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित केली. यासाठी इच्छुक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज 18 जुलै 2024 पासून 25 जुलै 2024 संध्याकाळी 5 : 00 वाजेपर्यंत भरायचे असणार आहेत.

पदांचा तपशील
सहाय्यक प्राध्यापक – 147 जागा

  • पनवेल : 48 जागा
  • फुंडे : 19 जागा
  • वाशी : 33 जागा
  • राजापूर : 23 जागा
  • मोखाडा : 24 जागा

शैक्षणिक पात्रता व पगार

निवड झालेल्या उमेदवाराला यूजीसी तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पगार देण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अर्ज भरायचे आहेत हे अर्ज 18 जुलै 2024 पासून 25 जुलै 2024 संध्याकाळी 5 : 00 वाजेपर्यंत भरायचे असणार आहेत.

निवड प्रक्रिया (Rayat Shikshan Sanstha Bharti)

प्राप्त क्सालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे, ही मुलाखत 27 जुलै 2024 रोजी सकाळी ९.00 वाजता घेतल्या जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी, मुंबई व महात्मा फुले आर्ट सायन्स व कॉमर्स विद्यालय पनवेल या ठिकाणी ही मुलाखत घेतली जाणार आहे.

महत्त्वाच्या सूचना (Rayat Shikshan Sanstha Bharti)

  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून सोबत ठेवावी सर्व आवश्यक असलेले गुणपत्रके तसेच प्रमाणपत्रे स्वसाक्षांकित करून मूळ कागदपत्र सुद्धा उमेदवाराने सोबत ठेवणे आवश्यक असेल.
  • उमेदवार हा मागास प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील.
  • उमेदवार जर अपंग असल्यास उमेदवाराने अपंगत्वाचे प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती मधून येत असेल तर त्या अर्जदारास नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट जोडणे गरजेचे राहील.
  • उमेदवाराने कशा पद्धतीने अर्ज करायचा कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची याविषयीचे सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे उमेदवाराने व्यवस्थित रित्या जाहिरात डाऊनलोड करावी, वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love

Leave a Comment