महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनक्रम
१. एप्रिल ११ इ.स.१८२७जन्म (कटगुण, सातारा)
२. इ.स. १८३४ ते १८३८पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
३.इ.स. १८४० नायगावच्याच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सात वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.
४.इ.स. १८४१ ते १८४७मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
५.इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवेदांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार.
६.इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.
७.इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
८.इ.स.१८४८शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
९. इ.स. १८४९शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.
१०इ.स. १८४९मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
११इ.स. १८५१चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
१२नोव्हेंबर १६ इ.स.१८५२मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
१३इ.स. १८४७थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास.
१४ इ.स. १८४८मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१५ इ.स.१८४८भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
१६ सप्टेंबर इ.स.१८५१भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१७ इ.स.१८५२पूना लायब्ररीची स्थापना.
१८ मार्च इ.स.१८५२वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१९. इ.स.१८५२मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
२०.इ.स.१८५३’दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स’ स्थापन केली.
२१.इ.स.१८५४स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
२२.इ.स.१८५५रात्रशाळेची सुरुवात केली.
२३.इ.स.१८५६जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
२४.इ.स.१८५८शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
२५. इ.स.१८६०विधवाविवाहास साहाय्य केले.
२६.इ.स.१८६३बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
२७.इ.स.१८६५विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
२८.इ.स.१८६४गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
२९.इ.स.१८६८दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
३०.इ. स. १९६९छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लेखन.
३१.जून इ. स. १९६९’शिक्षण विभागाचे ब्राह्मण पंतोजी’ रचना.
३२.इ. स. १९६९’ब्राह्मणाचे कसब’ या पुस्तकाचे लेखन.
३३.१३ ऑगस्टइ. स. १९६९भगवान परशुराम याला नोटीस.
३४.इ. स. १८७३’ गुलामगिरी’.
३५. २४ सप्टेंबर इ.स.१८७३ सत्यशोधक समाजची स्थापना केली.
३६.इ.स.१८७५शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
३७. इ.स. १८७५स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
३८.इ.स. १८७६ ते १८८२पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
३९.इ.स. १८८०दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
४०.इ.स.१८८०नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘मिलहॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
४१.इ.स.१८८२’विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
४२.इ.स.१८८७ सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
४३.इ.स.१८८८ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
४४.११ मे इ.स.१८८८मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली.
४५.नोव्हेंबर २८ इ.स.१८९०पुणे येथे निधन.