SSC, HSC Exam Date 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

SSC, HSC Exam Date 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

SSC, HSC Exam Date 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) च्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर वेळापत्रक हे नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि 12वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. (Maharashtra SSC HSC exam 2023 tentative time table announced by education board read in marathi at mahahsc.in mahahsscboard.in)

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहण्यासाठी बोर्डाच्या mahahsc.in या अधिकृत वेबसाईटला उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

 विभाग पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण
इयत्ता 12 वी लेखी परीक्षा कालावधी मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते सोमवार दिनांक 20 मार्च 2023
इयत्ता 10 वी लेखी परीक्षा कालावधी  गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 ते शनिवार दिनांक 25 मार्च 2023

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे.असे अहवान बोर्डाकडून करण्यात आले आहे.

 

Spread the love

Leave a Comment