SSC Result 2023 Live : 10वीचा निकाल जाहीर, येथे पहा ऑनलाईन निकाल.

 

10वी बोर्ड निकाल 2023 जाहीर

SSC Result 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल (2 जून) जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईट्सवर प्रसिद्ध केला जाणार आहे. 10th Board Exam Result through Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education

महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊनही निकाल जाहीर केला गेला आहे. दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली होती. या दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते.

SSC Result 2023 खालील लिंकवर पाहा:

1) mahresult.nic.in

2) ssc.mahresults.org.in

3) sscresult.mkcl.org

 

Spread the love

Leave a Comment