बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम, इत्यादी राबविण्यात येवून व इतर माध्यमातूनही विद्यार्थी, युवक-युवती, इत्यादिंचा विकास घडविण्यासाठी, “अमृत” Academy of Maharashtra Research, upliftment and Training (AMRUT) या नावाने नवीन स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर संस्थेस स्थापन करण्यासाठी प्रस्ताव दि.२० ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. मा.मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सदरहू संस्था स्थापन करणे व त्याची नोंदणी करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महाराष्ट्र राज्यात अनेक सामाजिक घटकांच्या विकासाठी महामंडळे, संस्था राज्यात कार्यरत असून उपरोक्त प्रमाणे बहुजन, दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने “महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) [Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (MAHAJYOTI)]” ही नवीन संस्था
स्थापन करण्यास व तिची नोंदणी करण्यास मा. मंत्रिमंडळाने दि. ३०.७.२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली, त्यानुसार दि.०८.०८.२०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. सदर संस्थेचे मुख्यालय पुणे येथे राहील.
अमृत GR डाउनलोड करा | क्लिक करा |