इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ होणार – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ होणार

राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अत्यल्प रक्कम दिल्या जात असल्यासोबत, शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याचा मुद्दा नेहमीच शाळा, विद्यार्थी व पालक वर्गाकडून उपस्थित कारण्यात येत होता. मात्र आता इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. पुण्यात एका पत्रकार परिषद मध्ये माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान सध्या आठवीच्या विद्यार्थ्यांना नववी व दहावी अशा दोन वर्गांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. पाचवीसाठी वर्षातील दहा महिन्यांसाठी एकूण २५० ते एक हजार रुपये, तर आठवीसाठी ३०० ते एक हजार ५०० रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर रक्कम खूपच अल्प असल्याची भावना विद्यार्थी – पालक यांच्याकडुन बोलून दाखवली जाते. यासंदर्भात लक्ष वेधले असता शालेय शिक्षण विभागाच्या सदर बाब विचारधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभाग यापुढे विद्यार्थीकेंद्रित काम करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती दिली जाते, त्याची रक्कम आपण वाढवू शकलेलो नाहीत. विभागाचे इतर खर्च कमी करून ही रक्कम कशी वाढवली जाईल, यावर भर देत असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.