इ. 5 वी व इ. 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा जिल्हा परिषद व मनपा निधीतून उपलब्ध करुन देणार, शासकीय परिपत्रक जाहीर.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निर्मित शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच ही सेस फंडातून मिळणार!

इ. 5 वी व इ. 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा जिल्हा परिषद व मनपा निधीतून उपलब्ध करुन देणार, शासकीय परिपत्रक जाहीर.
जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता विकासाकरीता जिल्हा परिषद सेस फंड, मनपा/ इतर निधीतून परीक्षा परिषद निर्मित ‘मार्गदर्शिका संच उपलब्ध करुन देण्यात यावेत अशा आशयचे एक परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी काढले आहे.

सदर परिपत्रका नुसार जिल्ह्यात इ. 5 वी व इ. 8 वी मध्ये शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला प्रविष्ठ होण्यास प्रोत्साहित करण्याबाबतच्या उपाययोजना आपल्या स्तरावरुन करण्यात याव्यात अशी विनंती आहे. यासाठी सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंड / मनपा निधीतून अदा केल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला बसण्याची संधी मिळेल.

सद्यस्थितीत संदर्भ क्र. 3 च्या शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. 5 वीच्या सर्व संचांकरीता रु.500/- प्रतिमाह प्रमाणे (रु.5000/- प्रतिवर्ष) व इ. 8 वीच्या सर्व संचांकरीता रु.750/- प्रतिमाह प्रमाणे (रु.7500/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे. त्याचा फायदाही विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात निश्चितच होईल.

परिपत्रक डाउनलोड – क्लिक करा 

इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला! ‘ या ‘ महिन्यात होणार परीक्षा.

इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला! ' या ' महिन्यात होणार परीक्षा.शिष्यवृत्ती परीक्षा अपडेट 2022 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे वतीने घेण्यात येणारी इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती माघील दोन महिन्यापासून लांबणीवर पडली होती. मात्र आता शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला असून, जून महिन्यात इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिकृतरित्या परिपत्रक काढून सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे कडून ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरता आले नाहीत, त्यांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहेत. दरम्यान टीईट परीक्षा पेपर फुटी प्रकारामुळे सदर परीक्षा ही कोणत्या कंपनी मार्फत घ्यायची या बाबत चाचपनी सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणे होते. आता विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. लवकरच पेपर छपाईचे काम सुरु करून सदर परीक्षा ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे. सदर शिष्यवृत्ती परीक्षेला इयत्ता ५ वीचे ४,१०,३९५ व इयत्ता ८ वीचे २ ,९९ ,२५५ विदयार्थ्यांनी आपले नाव नोंदणी केली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा मोफत ऑनलाईन सराव पेपर | पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी )

 

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फ्री टेस्ट 2021

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव

इयत्ता 5 वी ( मराठी माध्यम ) 

विषयप्रथम भाषा 

ऑनलाईन टेस्ट सोडावा