१० वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग २ विषयाचा पेपर फुटला!

१० वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग २ विषयाचा पेपर फुटला!शैक्षणिक अपडेट : इयत्ता १० वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग २ विषयाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर मधील जयसिंगपूर येथे घडला आहे. आज होणार पेपर कालच विद्यार्थ्यांना मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात सध्या चौकशी सूरु केली झाली असल्याची माहिती आहे.

दरम्यान सदर पेपरची विक्री ही पाचशे रुपयांना होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून समोर आली आहे. राज्यात सध्या विविध भरती पूर्व किंवा भरती परीक्षाचे पेपर फुटल्याचे प्रकार समोर आले असून त्या संदर्भात अनेक बड्या अधिकारी व इतर लोकांना अटक केली गेली आहे. यातच दहावी बारावी बोर्ड पेपर फुटल्या प्रकार घडत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.