कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्या प्रणालीद्वारे अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे ऊसतोडणी यंत्र निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ स्तरावरून योजनांच्या अंमलबजावणी प्रगतीचे प्रभावी सनियंत्रण करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा 👇
ऊसतोडणी यंत्राच्या अनुदान योजना अर्ज सुरु, लाभार्थी निवड निकष व आवश्यक कागदपत्रे |
यांना अनुदान घेता येणार –
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्राच्या खरेदीसाठी –
- वैयक्तिक शेतकरी,
- उद्योजक, सहकारी व खासगी साखर कारखाने,
- शेती सहकारी संस्था,
- शेतकरी उत्पादक संस्था इ.
ऊसतोडणी यंत्राच्या अनुदान योजनेसाठी अर्ज कसा कराल?
- https:// mahadbtmaharashtra.gov. in / Farmer या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.
- अर्जदारांनी प्रथम वापरकर्त्याचे नाव ( यूजर नेम ) व संकेत शब्द (पासवर्ड) तयार करून नोंदणी पूर्ण करावी.
- त्यानंतर पुन्हा लॉगइन करून त्यांचे प्रोफाइल तयार करावे.
- अर्जदारांना ऊसतोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी ‘वैयक्तिक लाभार्थी / उद्योजक’ व ‘शेती सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक संस्था / साखर कारखाने’ असे नोंदणी पर्याय उपलब्ध असतील.
आवश्यक कागदपत्रे –
प्रत्येक घटकाने अर्ज कशा पद्धतीने करावा, अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत याची सविस्तर माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे. ‘वैयक्तिक लाभार्थी / उद्योजक’ म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः त्यांचा वैयक्तिक तपशील भरणे आवश्यक आहे. सदर माहिती भरल्यानंतरच लाभार्थीना ऊसतोडणी यंत्र अनुदानासाठी अर्ज करता येईल. साखर कारखाने व गटांसाठी अर्ज करण्याची सुविधा २१ एप्रिलपासून सुरू होईल.