शैक्षणिक अपडेट : राज्यातील सरकारी शाळांच्या गुणवतेचा विषय नेहमीच चर्चेला जात असतो. यामध्ये जिल्हा परिषद शाळा व त्यातील शिकणा विद्यार्थी मध्यवर्ती असतो. आता पुन्हा हा मुद्दा शालेय विभागाने पुढे आणत शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी दशसूत्री शिक्षण विभागाकडून ” दशसूत्री ” जाहीर केली आहे. ही गुणवतेची दशसूत्री खालील प्रमाणे आहे.
शिक्षण विभागासाठी दशसूत्री
- गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करणे ,
- स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार करणे ,
- आनंददायी व नावीन्यपूर्ण शिक्षण ,
- आरोग्यवर्धक व संस्कारक्षम शिक्षण ,
- तंत्रस्नेही / आयटीक्षम शिक्षण ,
- सुप्त गुण शोधून त्यास प्रोत्साहन,स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन / लेखक / कवी निर्मिती ,
- कौशल्य चिकित्सक विचार, सृजनशिलता सहयोग ,
- ज्ञानातील आधुनिकता ग्रहण करण्यासाठी ,शिक्षकांनी प्रयत्न करणे ,
- स्वावलंबन प्रवृतीला चालना व देशभक्ती , मातृपितृ भक्ती वाढविणे ,
- गुरुकुल पद्धतीला उजाळा देत शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती ही दशसूत्री देण्यात आली आहे .