दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता!

दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता!शैक्षणिक अपडेट : शिक्षण विभागाकडून डिसेंबर महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले . त्यानुसार , बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या दरम्यान तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान होणार आहे . यासंदर्भातील घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात होण्याची चिन्हे आहे . यासंदर्भात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे .

याबाबत परीक्षा पुढे ढकलणे योग्य ठरणार असणार आहे कारण गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लिखाण सर्वासाठी आणखीन वेळ मिळणे आवश्यक असल्याचे म्हणणे विद्यार्थी व पालक वर्गातून पुढे येते आहे.
दरम्यान याची दखल शिक्षण विभाग व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलाव्यात , असे कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आहे . उपसंचालकांची आज ऑनलाईन बैठक झाली . त्यावेळी त्यांनी ही सूचना केली आहे .
थोडक्यात महत्वाचे –
परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रका नुसार

बारावीचा परीक्षा कालावधी – 4 मार्च ते 7 एप्रिल तर
दहावीचा परीक्षा कालावधी – 15 मार्च ते 18 एप्रिल

  • वेळापत्रकानुसार
    इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक , श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येतील .
  • लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होतील . तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल असा असेल .
  • प्रात्यक्षिक , श्रेणी / तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील .
    बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जूनच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल .
  • दहावीच्या प्रात्यक्षिक , श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुणांच्या परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येतील .
  • लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होतील .
  • तर प्रात्यक्षिक , श्रेणी / तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 5 ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील

Read more